WPL 2024 mumbai indians beat gujarat giants by 5 wickets secured number 1 spot in points table  twitter
Sports

WPL 2024: मुंबई इंडियन्सचा बॅक टू बॅक विजय! गुजरातला नमवत गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप

Mumbai Indians vs Gujarat Giants: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतही मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा जलवा पाहायला मिळत आहे.

Ankush Dhavre

Mumbai Indians vs Gujarat Giants, WPL 2024:

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतही मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा जलवा पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सला (Mumbai Indians vs Gujarat Giants) पराभूत करत स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) पराभूत केलं होतं.

हा सामना जिंकण्यासाठी मुंबईला १२७ धावांचं आव्हान दिलं गेलं होतं. या धावांचा पाठलाग करताना मुंबईने १८.१ षटकात ५ गडी गमावून हे आव्हान पूर्ण केलं. या विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. (WPL 2024)

गुजरात जायंट्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, तनुजा कंवरने सर्वाधिक २ गडी बाद केले. तर ली ताहुहू आणि कॅथरीन ब्रसने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

मुंबईने जिंकला टॉस..

या सामन्यात मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात जायंट्सने २० षटक अखेर ९ गडी बाद १२६ धावा केल्या. गुजरात जायंट्सकडून तनुजा कंवरने सर्वाधिक २८ धावा केल्या. तर कॅथरीन ब्रसने २५ धावा चोपल्या. तर बेथ मुनीनेही २४ धावा केल्या. (Cricket news marathi)

तसेच मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, अमेलिया कैरने ४ षटकात १७ धावा खर्च केल्या आणि ५ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. तर शबनीम इस्माईलने ४ षटकात १७ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. या विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ ४ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT