Manasvi Choudhary
मराठमोळा पारंपारिक लूकसाठी पेशवाई साडीला महिलांची पहिली पंसती असते. आजकाल लग्नसमारंभात मराठमोळ्या लूकसाठी पेशवाई साडी नेसतात.
पेशवाई साडीचे अनेक डिझाईन्स आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता. या साड्या कोणावरही उठून दिसतील.
पेशवाईसाडीमध्ये मुनिया डिझाईन कायमच ट्रेंडमध्ये असते. पारंपारिक लूकसाठी या साडीची खास निवड केली जाते.
पेशवाई मुनिया साडी ही हातावर विणलेली असते या साडीवर पोपटाची नक्षी असते ही साडी दिसायला खुप सुंदर असते.
पारंपारिक सोन्याच्या जरीपेक्षा आजकाल कॉपर जर ही साडी ट्रेंडमध्ये आहे. गुलाबी किंवा जांभळ्या रंगाच्या साडीवर तुम्हाला कॉपर वर्क केलेली डिझाईन पाहायला मिळेल. मॉडर्न लूकसाठी आजकाल या साडीची निवड केली जाते.
पेशवाई साडीमध्ये पारंपारिक टचसाठी मोर किंवा कमळाची फुले ही डिझाईन असते. पदरावरती ही डिझाईन खूपच आकर्षक दिसते.
बारीक बुट्टीची जरीवर्क केलेली ही साडी असते. पूर्ण साडी डिझाईन असते. या साड्या नेसल्यावर महिलांना राजेशाही लूक मिळतो.
सेमी-सिल्क किंवा सॉफ्ट-सिल्क पेशवाई साडी कम्फर्टेबल असते. या साड्या वजनाला हलक्या आणि कुठेही वापरता येणाऱ्या असतात.