CSK vs GT Final 2023: मराठमोळ्या माणसामुळे शक्य होऊ शकला IPL 2023 चा अंतिम सामना

Abhay Patankar: ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याचं क्रेडिट जितकं आयपीएल कमिटी आणि बीसीसीआयला जातं, तितकंच मराठमोळ्या माणसाला ही जातं.
ipl fnal
ipl fnalsaam tv
Published On

Narendra Modi Stadium: आयपीएलला जगातील सर्वोत्तम लीग का म्हटलं जातं,याच ताजं उदाहरण अंतिम सामन्यात पाहायला मिळालं आहे. स्पर्धेतील २ सर्वोत्तम संघ ट्रॉफी मिळवण्यासाठी मैदानात आले. शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.

अखेर शेवटच्या चेंडूवर जडेजाने चौकार मारला आणि चेन्नईने जेतेपदाला गवसणी घातली. यासह चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी उचलली.

ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याचं क्रेडिट जितकं आयपीएल कमिटी आणि बीसीसीआयला जातं, तितकंच मराठमोळ्या माणसाला ही जातं.

ipl fnal
IPL Final 2023: गर्जा महाराष्ट्र माझा! 'या' मराठमोळ्या खेळाडूंनी बनवलं 'चेन्नई'ला चॅम्पियन

पावसामुळे धुतला गेला अंतिम सामना..

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसार रविवारी (२८ मे) पार पडणार होता. मात्र या सामन्यात फलंदाजांऐवजी पावसाने तुफान फटकेबाजी केली. ७:३० ला सुरू होणारा सामना, पावसामुळे सुरू व्हायचं काही नाव घेत नव्हता. अखेर ११ वाजता पावसाचा जोर कमी झाला.

ग्राउंड स्टाफ आणि कर्मचाऱ्यांनी एका तासात खेळपट्टी सामना खेळण्यासाठी तयार करून देण्याचं आश्वासन दिलं. मात्र अंतिम सामन्याची मजा जाऊ नये म्हणून हा सामना रिझर्व्ह डे म्हणजे सोमवारी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. (Latest sports updates)

ipl fnal
Top 5 Moments Of IPL 2023: रिंकूचे ५ षटकार ते गावसकरांनी धोनीचा घेतलेला ऑटोग्राफ; हे आहेत IPL स्पर्धेतील टॉप मुमेंट्स

मराठमोळ्या माणसाचं कौतुक व्हायलाच हवं..

जगातील सर्वात मोठ्या लीग स्पर्धेचा अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर खेळवण्यात आला. हे स्टेडियम लेटेस्ट टेक्नॉलॉजीयुक्त आहे. अहमदाबादमध्ये २ दिवस जितका पाऊस पडला, तितका पाऊस इतर कुठल्याही स्टेडियमवर पडला असता तर, खेळपट्टीचं रूपांतर स्विमिंग पुलमध्ये झालं असतं.

मात्र मराठमोळ्या अभय पाठणकरने घेतलेली मेहनत यशस्वी ठरली. नरेंद्र मोदी स्टेडियमवरील ड्रेनेज सिस्टम हे वर्ल्ड क्लास आहे. किती ही पाऊस पडला तरी आऊटफिल्ड अवघ्या काही तासात खेळण्यासाठी तयार करता येते. ही आऊटफिल्ड बनवण्यात अभय पाठणकरने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे जर आयपीएलचा अंतिम सामना यशस्वीरित्या पार पडला त्याचं क्रेडिट अभय पाठणकरलाही जातं.

ipl fnal
IPL 2023 Prize Money: विजेत्या, उपविजेत्या संघासह खेळाडूंवरही झाला पैशांचा वर्षाव, जाणून घ्या बक्षिसांची रक्कम

नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील इतर स्टेडियमपेक्षा वेगळं का?

अहमदाबादमध्ये असलेलं नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. ६३ एकरांवर पसरलेले हा स्टेडियम बनवण्यासाठी तब्बल ७०० कोटींपेक्षाही अधिकचा खर्च आला आहे.

या स्टेडिअममध्ये जिम आणि वॉर्म अप करण्यासाठी वेगळी जागा आहे. तसेच ४ ड्रेसिंग रूम आहेत. सामना सुरू असताना पाऊस आल्यास, अवघ्या अर्ध्या तासात मैदान खेळण्यासाठी तयार केलं जाऊ शकतं.

या स्टेडियमलगत ५५ खोल्या असलेला क्लब हाऊस देखील आहे. तसेच स्विमिंग पूल,स्टीम आणि स्क्वाश कोर्ट देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com