Top 5 Moments Of IPL 2023: रिंकूचे ५ षटकार ते गावसकरांनी धोनीचा घेतलेला ऑटोग्राफ; हे आहेत IPL स्पर्धेतील टॉप मुमेंट्स

Top Moments Of IPL: पाहा आयपीएल २०२३ स्पर्धेतील टॉप ५ मुमेंट्स
ipl
ipl saam tv

IPL 2023 Top Moments: अखेर आयपीएल २०२३ स्पर्धा समाप्त झाली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नईने जोरदार विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली आहे. या विजयासह चेन्नईने पाचव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. दरम्यान पाहा आयपीएल २०२३ स्पर्धेतील टॉप ५ मुमेंट्स

ipl
IPL Final Winner: जडेजाचा अंतिम चेंडूवर चौकार अन् CSK ने पाचव्यांदा कोरलं जेतेपदावर नाव

एमएस धोनीने सुनील गावस्करांना दिला ऑटोग्राफ..

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा क्षण असू शकतो. कारण सुनील गावस्कर हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्यांचा इतर कुठल्याही खेळाडूंपैकी उंच आहे.

दरम्यान त्यांनी स्वतःहून एमएस धोनीकडे ऑटोग्राफची मागणी केली होती. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा साखळी फेरीतील अंतिम सामना चेपॉ कच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला होता.

या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडू क्रिकेट चाहत्यांना अभिवादन करताना दिसून आले होते. त्यावेळी धोनीने चाहत्यांसोबत फोटो देखील क्लिक केले होते. यादरम्यान सुनील गावस्करांनी धोनीकडे ऑटोग्राफची मागणी केली होती.

रिंकू सिंगचे ५ षटकार

रिंकू सिंग, हे नाव कोणीच विसरू शकणार नाही. काही वर्षांपूर्वी यक खेळाडूला कोणी ओळखतही नव्हतं. मात्र आयपीएल २०२३ स्पर्धेत संधी मिळताच त्याने संधीचं सोनं केलं. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात रिंकू सिंगने तुफानी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.

गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयासाठी अंतिम षटकात २८ धावांची गरज होती. त्यावेळी यश दयाल गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने सलग ५ षटकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. (Latest sports updates)

ipl
IPL 2023 Winner: गुजरातला नमवत थालाची CSK ठरली IPL चॅम्पियन! पाचवे जेतेपद मिळवत केली मुंबईची बरोबरी

नवीन उल हक - विराट कोहली वाद.

विराट कोहली हा आक्रमक खेळाडूंपैकी एक आहे. मैदानावर असताना तो विजय मिळवण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसून येत असतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल हक आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले होते.

हा सामना सुरू असताना जेव्हा नवीन उल हक फलंदाजी करत होता, त्यावेळी विराट त्याला काहीतरी बोलताना दिसून आला होता. जेव्हा तो बाद झाला तेव्हा या दोघांमध्ये बाचाबाची सुरू होती. सामना झाल्यानंतर ही बाचाबाची आणखी वाढली.

शेवटी गंभीर आणि विराट यांच्यात देखील वाद झाला होता. मात्र खेळाडूंनी मध्यस्थी केल्याने हा वाद जास्त चिघळला नव्हता.

यशस्वी जयस्वालची कामगिरी..

राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना यशस्वी जयस्वालने जोरदार कामगिरी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात या फलंदाजाने अवघ्या १३ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. त्याच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, १४ सामन्यांमध्ये त्याने ६२५ धावा केल्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे.

चेन्नईने मिळवलं जेतेपद..

स्पर्धेतील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. यासह चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाचवे जेतेपद मिळवले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com