IND vs ENG, 4th test : भारताचा पहिला डाव 307 धावांवर आटोपला, इंग्लंडला 46 धावांची आघाडी; ध्रुव जुरेलचे शतक हुकलं

IND vs ENG, 4th test : ध्रुव जुवेलने १४९ चेंडूंमध्ये ९० धावा ठोकल्या. तर कुलदीप यादवने १३१ चेंडूत २८ धावा करत जुवेलला चांगली साथ दिली.
IND vs ENG, 4th test
IND vs ENG, 4th testSaam TV
Published On

IND vs ENG, 4th test :

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात  भारतीय संघाचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी ३०७ धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. इंग्लंड दुसऱ्या डावात ४६ धावांच्या आघाडी मिळाली आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघ अडचणीत होता. सात विकेट्स गमावत भारताने २१९ धावा केल्या होत्या. मात्र ध्रुव जुवेल आणि कुलदीप यादवने ७६ धावांची भागिदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. (Latest News)

टीम इंडिया १७१ वर सहा विकेट अशा बिकट स्थितीत असरताना ध्रुव जुवेल मैदानात आला होता. त्याने कुलदीप यादवच्या जोडीन चांगली भागिदारी करत संघाचा डाव सावरला. ध्रुव जुवेलने १४९ चेंडूंमध्ये ९० धावा ठोकल्या. तर कुलदीप यादवने १३१ चेंडूत २८ धावा करत जुवेलला चांगली साथ दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IND vs ENG, 4th test
WPL 2024 RCB vs UPW : RCBचा पहिला विजय; यूपी वॉरियर्सचा २ धावांनी पराभव, शोभनाचा विजयी 'पंजा'

भारताने तिसऱ्या दिवशी ८८ धावा करताना तीन विकेट गमावल्या. कुलदीव यादव २८ धावा करून बाद झाला. यानंतर आकाश दीप फलंदाजीला आला आणि त्याने जुरेलसोबत ४० धावांची भागीदारी केली. ९ धावा करून आकाशही बाद झाला. शेवटी जुरेल बाद झाला आणि भारताचा डाव संपुष्टात आला. इंग्लंडकडून शोएब बशीरने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील बशीरची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

IND vs ENG, 4th test
IND vs ENG, Ranchi Test Day-2: भारतीय फलंदाजांची घसरगुंडी; ७ गडी गमावत टीम इंडियाच्या २१९ धावा

दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा २ धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिलने यशस्वी जैस्वालसोबत ८२ धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ १७ धावा केल्या. रवींद्र जडेजाही १२ धावा करून बाद झाला. यशस्वीने पुन्हा एकदा चमकदारी कामगिरी करत ७३ धावा कुटल्या. सरफराज १४ तर अश्विन १ धाव करून बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com