T20 world cup 2026 final  SAAM TV
Sports

T20 World Cup final : वर्ल्डकप फायनलवेळी राडा, भारताची विकेट पडल्यामुळे वाद, १७ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या

fight during cricket match in India : बिहारमधील वैशाली जिल्ह्यात टी20 वर्ल्डकप फायनल पाहताना झालेल्या वादातून १७ वर्षांच्या कुंदन कुमारची निर्घृण हत्या झाली. भारताची विकेट पडल्यावर झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले .

Namdeo Kumbhar

teen killed after argument during T20 World Cup final in Bihar : न्यूझीलंडचा पराभव करत भारताने टी२० विश्वचषकावर नाव कोरले. अहमदाबादच्या मैदानावर ऐतिहासिक सामना सुरू असताना बिहारमध्ये मात्र एक दुःखद घटना घडली. वैशाली जिल्ह्यात सामन्यादरम्यान झालेल्या गैरसमजामुळे एका दिव्यांग मुलाची हत्या करण्यात आली आहे. जक्कोपूर गावात काही मित्र मोबाईलवर सामना पाहता होते. त्यावेळी भारताची विकेट पडल्यानंतर राडा झाला. त्यामध्ये १७ वर्षाच्या कुंदन कुमार याची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.

रविवारी संध्याकाळी टी-२० विश्वचषक फायनल पाहण्यावरून दोन जणांमध्ये झालेला वाद इतका वाढला की कुंदन कुमार याची हत्या करण्यात आली. सामन्यादरम्यान टीम इंडियाचा विकेट पडल्यानंतर कुंदन यानं दिलल्या प्रतिक्रियेचे रूपांतर हिंसक भांडणात झाले. त्यामधून हाणामारी झाल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली. या हल्ल्यात कुंदन गंभीर जखमी झाला होता. रूग्णालयात घेऊन जात असताना कुंदन याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावात तणाव निर्माण झाला.

स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, जक्कोपूर गावातील काही तरुण मोबाईल फोनवर भारत-न्यूझीलंडचा अंतिम सामना पाहत होते . सामन्यादरम्यान भारतीय संघाची विकेट पडली. त्यावेळी कुंदन मोठ्याने ओरडला. जवळच उभ्या असलेल्या दुसऱ्या एका तरुणाने आवाज ऐकला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद काही मिनिटांत हिंसक झाला. आरोपीने कुंदन याला बेदम मारहाण सुरू केली. त्याला जमिनीवर ढकलले अन् मारहाण केली. कुंदन याच्या डोक्याला मार लागला.

वर्ल्डकपचा सामना पाहत असताना, भारताची विकेट पडल्याने दोघांमध्ये वाद झाला. भांडणावेळी मृतक कुंदन याचे डोके ब्रेकरवर आदळले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचा जीव वाचला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वैशाली जिल्ह्यातील जक्कोपूर या गावात घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. १८ वर्षीय किशन कुमारने १७ वर्षीय कुंदनला जमिनीवर ढकलले. कुंदनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अन् रक्तस्त्राव सुरू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही मुलांनी धावा घेतली. पण तोपर्यंत कुंदन बेशुद्ध पडला होता, असे पीडितेच्या कुटुंबाने आरोप केला आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

Kalyan Crime: घंटागाडीत सापडला महिलेचा मृतदेह, कल्याण- डोंबिवलीमध्ये खळबळ

Uttapam Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट उत्तपम; जाणून घ्या सोपी रेसिपी

भारताच्या राजधानीत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश; 7 जणांच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra News Live Update: अकोल्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 33 लिटर दुधाचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT