team india twitter
क्रीडा

World Cup Semi Final: टीम इंडियाचं सेमीफायनलचं ठीकाण बदलणार! समोर आलं मोठं कारण

World Cup Semi Final Venue: भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

World Cup Semi Final Venue Will Change:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाचा दरारा कायम आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. साखळी फेरीतील सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

यासह भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. त्यामुळे भारतीय संघ सेमी फायनलचा पहिला सामना खेळणार हे जवळजवळ निश्चित आहे.

हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र पाकिस्तानने वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यास सामन्याच्या ठिकाणात बदल केला जाऊ शकतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय संघ अव्वल स्थानी राहिल्यास भारतीय संघाचा सेमीफायनलचा सामना गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या संघासोबत रंगणार आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिला सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

तर सेमीफायनलचा दुसरा सामना १६ नोव्हेंबर रोजी ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. सेमी फायनलचा पहिला सामना खेळण्यासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या ३ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. (Latest sports updates)

तर सेमीफायनलच्या सामन्याचं ठिकाण बदलणार..

जर पाकिस्तानने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर मुंबईत होणारा सामना हा कोलकात्यात खेळवला जाईल. यामागचं प्रमुख कारण असं की, २००८ मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.

या हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा हात असल्याचं समोर आलं होतं. या हल्ल्यानंतर भारत -पाकिस्तान द्विपक्षीय मालिकांवर बंदी घालण्यात आली होती.

तसेच पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यावरही बंदी आणली गेली होती. हे पाहता बीसीसीआय आणि आयसीसीने पाकिस्तानचा सेमीफायनलचा सामना कोलकात्यात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत- दक्षिण आफ्रिकेचा सेमीफायनलमध्ये प्रवेश..

भारतीय संघाने श्रीलंकेला धुळ चारत वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा सामना गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या संघासोबत होईल.

तर दक्षिण आफ्रिका हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला आहे. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या संघाचा सामना तिसऱ्या स्थानी असलेल्या संघासोबत होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा येणार

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT