'अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले उत्तम मुख्यमंत्री'; विधीमंडळात दादांच्या आठवणींना उजाळा

Tribute To Ajit Pawar : अजितदादांच्या आठवणीत विधीमंडळात सत्ताधाऱ्यांसह विरोधकही भावूक झाले. अजितदादांची प्रशासनावरील पकड किती मजबूत होती. आणि महाराष्ट्राला न लाभलेला हा उत्तम मुख्यमंत्री विरोधकांसह सत्ताधाऱ्यांसाठी किती महत्त्वाचा होता. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Chief Minister Devendra Fadnavis paying tribute to Ajit Dada during the condolence motion in the Maharashtra Legislature.
Chief Minister Devendra Fadnavis paying tribute to Ajit Dada during the condolence motion in the Maharashtra Legislature.
Published On

राज्याच्या राजकारणातील एक धगधगतं पर्व, अष्टपैलू नेतृत्व आणि 'दादा' या शब्दाला खऱ्या अर्थानं वजन प्राप्त करून देणाऱ्या अजितदादाच्या अकाली एक्झिटनं अनेकांना धक्का बसला. विधिमंडळातील शोकप्रस्तावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ''महाराष्ट्राला न लाभलेले उत्तम मुख्यमंत्री' अशा शब्दांत दादांच्या प्रशासनावरील पकड आणि कार्यपद्धतीचं कौतुक केलयं.

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही शोकप्रस्तावावर बोलताना भावूक झाले. "दादांनी वेळ चुकवली," असं म्हणत लाखांचा पोशिंदा जगायला हवा होता, अशी खंत शिंदेंनी बोलून दाखवली. इतकचं काय तर उद्धव ठाकरेंनीही अजितदादांच्या शिस्तीची तुलना थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी केलीय. तर दुसरीकडे, विजय वडेट्टीवार यांनी राज्यात भाऊ खूप आहेत आणि होतीलही पण दादा एकच" असं म्हणत अजितदादांच्या आठवणींना वाट मोकळी करून दिलीय. तर दुसरीकडे, विजय वडेट्टीवार यांनी राज्यात भाऊ खूप आहेत आणि होतीलही पण दादा एकच" असं म्हणत अजितदादांच्या आठवणींना वाट मोकळी करून दिलीय.

सत्ताधारी असो की विरोधक दादांच्या एक्झिटनं प्रत्येकाच्या डोळ्यात आज आसवं दाटून आली. दादांसारखं वादळी नेतृत्व महाराष्ट्रानं गमावल्याचं सभागृहातील नेत्याच्या भाषणानं पुन्हा अधोरेखित झालयं...मात्र नियतीनं राज्याच्या भविष्यातलं एक 'उत्तम मुख्यमंत्री' होण्याचं स्वप्न अधुरं ठेवलं असलं, तरी जनतेच्या मनातला 'लाखांचा पोशिंदा' म्हणून दादांचं नाव कायम स्मरणात राहिलं हे निश्चित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com