rohit sharma saam tv
Sports

Rohit Sharma, Champions Trophy: रोहितला पाकिस्तानात जावंच लागणार? काय सांगतो ICC चा नियम?

ICC Rule For Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ओपनिंग सेरेमनीचे आयोजन केले जाणार आहे. पण रोहित पाकिस्तानला जाणार की नाही, हा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरीदेखील भारतीय संघाचे सामने हायब्रिड मॉडेलनुसार, दुबईत खेळवले जाणार आहेत.

या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडून ओपनिंग सेरेमनीचे आयोजन केले जाणार आहे. मात्र रोहित शर्मा या सेरेमनीसाठी पाकिस्तानात जाणार की नाही, यावर अजूनही स्पष्टीकरण आलेलं नाही. माध्यमातील वृत्तानुसार, बीसीसीआयने रोहितला पाकिस्तानात पाठवण्यास नकार कळवला आहे. मात्र रोहितशिवाया ओपनिंग सेरेमनी आणि कर्णधारांचं फोटोशूट कसं होणार, हा पीसीबीसमोर असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे.

रोहितला पाकिस्तानात जावंच लागणार?

जेव्हा आयसीसीच्या कुठल्याही स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्याआधी शानदार ओपनिंग सेरेमनीचे आयोजन केले जाते. या स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे १६ किंवा १७ फेब्रुवारीला ओपनिंग सेरेमनीचे आयोजन केले जाऊ शकते. आयसीसीच्या नियमानुसार, सर्व संघातील कर्णधारांना ओपनिंग सेरेमनीला हजेरी लावाणं बंधनकारक आहे.

या सोहळ्यावेळी सर्व कर्णधारांना स्टेजवर बोलवलं जातं. यासह यजमान देशाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन केलं जातं. यासह कर्णधारांना प्रश्न विचारले जातात. यापूर्वी २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार भारतात रंगला होता. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. बीसीसीआयने तर रोहितला पाकिस्तानात पाठवण्यास विरोध केला आहे. पण जर आयसीसीने हस्तक्षेप केला, तर रोहितला पाकिस्तानात जावच लागेल.

या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारीला भारताचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. तर २ मार्चला भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नारळी पौर्णिमा अन् राखी पौर्णिमा कधी आहे? भद्रा आणि चंद्रग्रहणामुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भारताच्या नंदनवनात आणखी एक वंदे भारत ट्रेन धावणार; कोणत्या स्टेशनवर थांबणार?

Maharashtra News Live Update: सोलापुरातील विडी उद्योजकांचा महाराष्ट्र सोडून तेलंगणात जाण्याचा ईशारा

Toxic Movie: यशच्या 'टॉक्सिक'ची जोरदार क्रेझ; ॲडव्हान्स बुकिंगमधूनच केली इतक्या कोटींची कमाई

August 31 Deadline: 31 ऑगस्टपूर्वी ही 4 कामं करा, नाहीतर भरावा लागू शकतो दंड!

SCROLL FOR NEXT