भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजीत योगदान देता आलं नाही. या सामन्यात तो २० धावा करत माघारी परतला. संघाचा डाव सावरत असताना तो २० धावा करत माघारी परतला. फलंदाजीत फ्लॉप ठरला असला तरीदेखील यष्टीरक्षण करताना त्याने काही भन्नाट झेल टिपले. ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तर झाले असे की, भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर १८१ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १८२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानकडून गुलबदीन नईबने अफगाणिस्तानचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला.मात्र ११ व्या षटकात त्याला कुलदीप यादवने बाद करत माघारी धाडलं.
भारतीय संघाकडून ११ वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला होता. त्यावेळी दुसऱ्या चेंडूवर नईबने स्वीप शॉट मारुन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची कडा घेत हवेत गेला आणि रिषभ पंतने धावत जाऊन हा झेल टिपला. रोहित शर्मालाही हा झेल पकडण्याची संधी होती. मात्र रोहित धावलाच नाही.
त्याने रिषभ पंतला झेल पकडण्याचा इशारा केला. ज्यावेळी त्याने हा झेल यशस्विरित्या पूर्ण केला. त्यावेळी तो रोहितच्या जवळ गेला. त्याला रोहितने सरळ म्हटलं की, दुर राहा. रोहितला हेच म्हणायचं होतं की, हा तुझा झेल आहे तुच पकड.हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सुपर ८ फेरीतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने विजयाचा गुलाल उधळला आहे. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकअखेर १८१ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने अर्शतकी खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्ताचा डाव १३४ धावांवर आटोपला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.