rohit sharma saam tv news
Sports

Rohit Sharma: सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रोहित बाहेर का गेला? खरं कारण आलं समोर

India vs Afghanistan 3rd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या सामन्यात डबल सुपर ओव्हर पार पडली. दरम्यान रोहित शर्मा शेवटच्या चेंडूवर बाहेर गेला होता.

Ankush Dhavre

Rohit Sharma Retired Hurt Of Retired Out Debate:

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील सुरुवातीचे २ सामने जिंकत भारतीय संघाने २-० ने विजयी आघाडी घेतली होती. दरम्यान मालिकेतील तिसरा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला. यासह मालिका ३-० ने खिशात घातली.

दरम्यान पहिल्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूपूर्वी रोहित शर्मा मैदानाच्या बाहेर गेला होता. त्याच्याऐवजी रिंकू सिंग फलंदाजीला आला होता. रोहित बाहेर का आणि कशाला गेला? तो रिटायर हर्ट होता की रिटायर आऊट होता? असे असंख्य प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

रोहित शर्मा रिटायर हर्ट होता की रिटायर आऊट हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. कारण डबल सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मा फलंदाजी करण्यासाठी आला होता. जर नियम पाहिला तर आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानूसार जर एखादा फलंदाज पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झाला असेल तर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी येऊ शकत नाही. त्यामुळे जर तो रिटायकर आऊट होऊन माघारी परतला असता तर तो पुन्हा एकदा फलंदाजीला येऊ शकला नसता. मात्र रोहित शर्मा माघारी का परतला याचं खरं कारण अजूनही समोर येऊ शकलेलं नाही. (Latest sports updates)

इएसक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा रिटायर आऊट असल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरं कारण असंही सांगितलं जात आहे की, शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाला विजयासाठी २ धावांची गरज होती. त्यामुळे खेळपट्टीवर कोणीतरी वेगवान धावणारा फलंदाज हवा होता. त्यामुळे रोहितने मैदान सोडलं आणि रिंकू सिंग फलंदाजीला आला.

तर सामना झाल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की,'' मला माहित नाही हे याआधी कधी झालं होतं. मला असं वाटतंय की मी याआधी आयपीएलमध्येही तीन वेळा फलंदाजीसाठी उतरलोय. आमच्यासाठी भागीदारी करणं अतिशय महत्वाचं होतं. रिंकू माझ्यासोबत सतत चर्चा करत होता. २२ वर ४ फलंदाज बाद झाल्यानंतर आमच्यावर दबाव होता. त्यामुळेच खेळपट्टीवर टिकून राहणं आमच्यासाठी अतिशय महत्वाचं होतं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT