navdeep singh twitter
क्रीडा

Navdeep Singh: पॅरालिम्पिकमध्ये पेटला नवा वाद! इराणच्या खेळाडूचं गोल्ड मेडल हिसकावून भारतीय खेळाडूला का दिलं?

Sadegh Sayah Disqualification: भालाफेकच्या फायनलमध्ये असं नेमकं काय घडलं की, इराणच्या खेळाडूचं गोल्ड मेडल हिसकावून भारतीय खेळाडूला द्याव लागलं?

Ankush Dhavre

Why did Iranian athlete Sadegh Beit Sayah get disqualified: पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत एक आगळी वेगळी घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय भालाफेकपटू नवदीप सिंगने पुरुषांच्या एफ 41 कॅटेगरीतील फायनलमध्ये प्रवेश केला होता.

या फायनलमध्ये त्याने रौप्य पदकाला गवसणी घातली होती. मात्र त्याला सुवर्ण पदक देण्यात आलं आहे. तर चौथ्या स्थान असलेल्या खेळाडूने पदकाची आस सोडून दिली होती. मात्र त्याला कांस्यपदक देण्यात आलं आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

नवदीप सिंगने रचला इतिहास

नवदीप सिंगने पुरुषांच्या भालाफेत एफ १ श्रेणीत पहिलंच सुवर्णपदक जिंकलं आहे. यापूर्वी कुठल्याही खेळाडूला या श्रेणीमध्ये सुवर्णपदक जिंकता आलं नव्हतं. या शानदार कामगिरीसह त्याने इतिहास रचला आहे. पहिल्या प्रयत्नात त्याने फाऊल थ्रो केला.

त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ४६.३९ मीटर लांब थ्रो केला. या थ्रो सह त्याने शानदार कमबॅक केलं. त्यानंतर पुढच्या थ्रो मध्ये त्याने ४७.३२ मीटर लांब थ्रो केला आणि पॅरालिम्पिक रेकॉर्ड मोडून काढला.

त्यानंतर इरानच्या खेळाडूने नवदीप सिंगपेक्षाही चांगली कामगिरी केली. त्याने आपल्या पुढील प्रयत्नात ४७.६४ मीटर लांब थ्रो केला. या थ्रो च्या बळावर त्याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. मात्र फायनल झाल्याच्या काही मिनिटांनंतर इरानच्या खेळाडूला अपात्र घोषित करण्यात आलं. त्यामुळे रौप्य पदक विजेत्या नवदीप सिंगला सुवर्णपदक देण्यात आलं.

फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर इरानचा खेळाडू सादेघ बेत सहायने पॅरालिम्पिक नियमांचं उल्लंघन केलं आहे. सुरुवातीला त्याला अधिकाऱ्यांनी पिवळं कार्ड दाखवलं. त्यानंतर वर्ल्ड अॅथलेटीक्सने त्याला नियमांचं उल्लंघन केल्यामुळे थेट स्पर्धेतून बाहेर काढलं. त्याने विजय मिळवल्यानंतर एक झेंडा दाखवला, जे ऑलिम्पिक नियमांच्या विरोधात आहे.

काय सांगतो नियम?

सादेगला आचारसंहीतेच्या ८.१ च्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे स्पर्धेतून बाहेर करण्यात आलं आहे. या नियमानुसार, खेळात नैतिकता, अखंडता आणि आचरणाचे उच्चतम मानके ठेवण्यासाठी खेळाडू, प्रशिक्षक, प्रशासक आणि अधिकारी यांचा समावेश होतो. खेळातील मानकं टीकवून ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे ही त्यांची जबाबदारी आहे की, खेळ हा प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीनेच खेळला गेला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT