Paris Paralympics 2024: सिंग इज किंग! Harvinder Singh ने गोल्डवर निशाणा साधत रचला इतिहास

Harvinder Singh Archery: पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय तिरंदाज हरविंदर सिंगने गोल्डवर निशाणा साधत रचला इतिहास रचला आहे.
Paris Paralympics 2024: सिंग इज किंग! Harvinder Singh ने गोल्डवर निशाणा साधत रचला इतिहास
harvinder singh twitter
Published On

Harvinder Singh Won Gold In Archery: पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे. स्पर्धेतील सातव्या दिवशीही भारताने पदकांचा पाऊस पाडला. तिरंदाजीत हरविंदर सिंगने सुवर्ण पदकावर निशाणा साधला.

हरविंदरने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्वच्या फायनलमधील तिन्ही सेटमध्ये पराभूत केलं आणि सुवर्ण पदक पटकावलं. फायनलमध्ये त्याने पोलंडच्या लुकास्ज सिस्जेकला पराभूत केलं. मुख्य बाब म्हणजे हे ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये भारताचं पहिलंच पदक ठरलं आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, फायनलमध्ये त्याने वन साईड खेळ केला. त्याने पहिला सेट २८-२४ ने जिंकत २ गुणांची कमाई केली. दुसऱ्या सेटमध्येही त्याने २८-२४ गुणांची कमाई केली. हा सेट जिंकत त्याची आघाडी ४-० वर जाऊन पोहोचली. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये २९-२५ ने जिंकत त्याने आणखी २ गुणांची कमाई केली. यासह हा सामना ६-० ने आपल्या नावावर केला.

भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत अप्रतिम खेळ करून दाखवला आहे. भारताची पदकांची संख्या २४ वर जाऊन पोहोचली आहे. ही आतापर्यंत भारताची पॅरालिम्पिक स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने आतापर्यंत ५ सुवर्ण, ९ रौप्य आणि १० कांस्य पदकाची कमाई केली आहे.

Paris Paralympics 2024: सिंग इज किंग! Harvinder Singh ने गोल्डवर निशाणा साधत रचला इतिहास
Paris Paralympics 2024: मराठमोळा 'सचिन' पॅरिसमध्ये चमकला! सांगलीच्या पठ्ठ्यानं पटकावलं रौप्य पदक

क्लब थ्रो मध्ये २ पदकं

स्पर्धेतील सातव्या दिवशी, एकाच क्रीडा प्रकारात भारताला २ पदकं मिळाली आहेत. क्लब थ्रो च्या एफ 51 प्रकारात धरमवीर आणि प्रणवने सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली आहे. धरमवीरने ३४.९२ मीटर लांब थ्रो करत सुवर्ण पदक जिंकलं. तर प्रणवने ३४.५९ मीटर लांब थ्रो करत रौप्य पदक पटकावलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com