Paris Paralympics 2024: मराठमोळा 'सचिन' पॅरिसमध्ये चमकला! सांगलीच्या पठ्ठ्यानं पटकावलं रौप्य पदक

Sachin Sarjerao Khilari Won Silver Medal: मराठमोळ्या सचिन खिलारीने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी घातली आहे.
Paris Paralympics 2024: मराठमोळा 'सचिन' पॅरिसमध्ये चमकला! सांगलीच्या पठ्ठ्यानं पटकावलं रौप्य पदक
sachin khilari twitter
Published On

भारतीय खेळाडूंचा अॅथलेटीक्समध्ये दबदबा सुरुच आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेतील F46 कॅटेगरीतील गोळाफेक प्रकारात मराठमोळ्या सचिन सरजेराव खिलारीने १६.३२ मीटर गोळा फेकत रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. फायनलमध्ये सचिनने आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात १६.३२ मीटर थ्रो केला आणि रौप्य पदकाला गवसणी घातली. मुख्य बाब म्हणजे त्याचं सुवर्ण पदक अवघ्या ०.०६ मीटरने हुकलं.

मराठमोळा सचिन चमकला

गोळाफेक प्रकारातील फायनलमध्ये कॅनडाच्या च ग्रेग स्टीवर्टने १६.३८ मीटर लांब थ्रो करत सुवर्ण पदकावर कब्जा केला. या स्पर्धेत सचिनसह मोहम्मद यासेर आणि रोहित कुमार यांनी देखील फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलमध्ये मोहम्मद यासेर आठव्या स्थानी राहिला. तर रोहित कुमारला नवव्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. तर मराठमोळ्या सचिनने घवघवीत यश मिळवलं आहे.

Paris Paralympics 2024: मराठमोळा 'सचिन' पॅरिसमध्ये चमकला! सांगलीच्या पठ्ठ्यानं पटकावलं रौप्य पदक
जागतिक Para-Badminton स्पर्धेत यथिराज,प्रमोद,कृष्णा अंतिम फेरीत | Marathi News

असं मिळवलं रौप्य पदक

गोळाफेक प्रकारातील फायनलमध्ये सचिनने पहिल्या प्रयत्नात १४.७२ मीटर लांब थ्रो केला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात १६.३२ मीटर थ्रो केला. हा त्याचा फायनलमधील सर्वोत्तम थ्रो ठरला. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने १६.१५ मीटर, चौथ्या प्रयत्नात त्याने १६.३१ मीटर, पाचव्या प्रयत्नात १६.०३ आणि सहाव्या प्रयत्नात त्याने १६.०३ मीटर लांब थ्रो केला. यासह १६.३२ मीटर लांब थ्रो सह त्याने रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं.

भारतीय संघाचं हे पॅरालिम्पिक स्पर्धेतील २१ वं पदक ठरलं आहे. अॅथलेटीक्समध्ये भारताने सर्वाधिक ११ पदकांची कमाई केली आहे. सचिनबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २०२३ वर्ल्ड पॅरा अॅथलेटीक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या एफ46 गोळाफेक प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. या स्पर्धेतील फायनलमध्ये त्याने १६.२१ मीटर लांब थ्रो करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं होतं.

Paris Paralympics 2024: मराठमोळा 'सचिन' पॅरिसमध्ये चमकला! सांगलीच्या पठ्ठ्यानं पटकावलं रौप्य पदक
Paris Paralympics 2024 Schedule: भारताला आजही 4 पदकं मिळणार? Avani Lekhara रचणार इतिहास; पाहा वेळापत्रक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com