India At Paris Paralympics 2024: पॅरिसमध्ये पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा थरार सुरु आहे. भारताने १९६० मध्ये पहिल्यांदा पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत ६४ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने ते करुन दाखवलं आहे, जे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. भारतीय खेळाडूंनी या पॅरालिम्पिक स्पर्धेत ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये शानदार कामगिरी करुन दाखवली आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय अॅथलिट्सचा दबदबा पाहायला मिळाला आहे. पहिल्यांदाच पॅरालिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय अॅथलेटीक्स खेळाडूंच्या पदकांच्या संख्येने दुहेरी आकडा गाठला आहे.
यापूर्वी कुठल्याही पॅरालिम्पिक स्पर्धेत, कुठल्याही क्रीडा प्रकारात असं घडलं नव्हतं. मुख्य बाब म्हणजे अजूनही पॅरालिम्पिक स्पर्धा समाप्त झालेली नाही. त्यामुळे या पदकांच्या संख्येत आणखी भर पडू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत १९ पदकांची कमाई केली होती. ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. आता भारतीय खेळाडूंनी २० पदकं जिंकली आहेत. अजूनही ही स्पर्धा संपलेली नाही. त्यामुळे पदकांची संख्या आणखी वाढू शकते. भारताने आतापर्यंत ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्यपदकं जिंकली आहेत.
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रीती पालने आतापर्यंत २ पदकांची कमाई केली आहे. तिने महिलांच्या १०० मीटर आणि २०० मीटर T35 प्रकारात हा कारनामा करुन दाखवला होता. निशाद कुमारने उंच उडी प्रकारात भारताला रौप्य पदक जिंकून दिलं. योगेश कथुनियाने पुरुषांच्या थाळीफेक प्रकारात रौप्य पदकाला गवसणी घातली.
सुमित अंतिलने भालाफेक प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. त्यानंतर दीप्ती जीवनजीने महिलांच्या ४०० मीटर टी-२० प्रकारात पदक जिंकून दिलं. तर शरद कुमारने उंच उडी, मरियप्पन थंगवेलुने उंच उडी, त्यानंतर सुंदर सिंग गुर्जर आणि अजीत सिंग यांनी भालाफेक प्रकारात भारताला पदक जिंकून दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.