पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरु आहे. २ सप्टेंबर हा दिवस फॅन्स कधीच विसरु शकणार नाहीत. भारतीय खेळाडूंनी एकाच दिवशी भारताला ८ पदकं जिंकून दिली आहे.
या ८ पदकांसह भारतीय संघाने आतापर्यंत एकूण १५ पदकं जिंकली आहेत. भारताकडून सुमीत अंतिलने भालाफेक प्रकारात सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. तर नितेश कुमारनेही बॅडमिंटनच्या फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनलच्या फायनलमध्ये पराभूत केलं आणि सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे.
स्पर्धेतील चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंच्या पदकांची संख्या १५ वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान स्पर्धेतील सहाव्या दिवशीही भारतीय खेळाडूंना आणखी ४ पदकं जिंकण्याची संधी असणार आहे. मोना अगरवाल आणि अवनी लेखरा पुन्हा एकदा पदक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
भारताची शूटर अवनी लेखरा ५० मीटर रायफल ३ पोझिशन SH1 प्रकारात सहभाग घेणार आहे. तर भाग्यश्री जाधव गोळाफेक प्रकारात अॅक्शनमध्ये असणार आहे. एकूणच आजही भारतीय खेळाडू पदकांचा पाऊस पाडू शकतात. २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण १९ पदकं जिंकली होती. आज जर ४ पदकं जिंकली, तर या रेकॉर्डची देखील बरोबरी केली जाणार आहे. यासह या रेकॉर्डमध्ये आणखी भर देखील घातली जाऊ शकते.
असं आहे वेळापत्रक (३ सप्टेंबर)
१ वाजता - पॅरा शूटिंग - अवनी लेखरा, मोना अग्रवाल (महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन SH1 क्वालिफिकेशन इवेंट - R8)
२:२८ वाजता- पॅरा अॅथलेटिक्स - भाग्यश्री एम. जाधव (महिला शॉट-पुट - F34 फायनल)
३:२० वाजता - पॅरा तिरंदाजी - पूजा (महिला व्यक्तिगत रिकर्व ओपन 1/8वा एलिमिनेशन इव्हेंट)
७:३० वाजता - पॅरा शूटिंग - (मेडल इवेंट, जर क्वालिफाय झाले तर) - अवनी लेखरा, मोना अगरवाल, (महिलांची 50 मीटर राइफल 3 पझिशन SH1 - R8)
९:२१ वाजता- पॅरा तिरंदाजी - पूजा महिला व्यक्तिगत रिकर्व ओपन क्वार्टर फायनल (जर क्वालिफाय झाले, तर)
९:५५ वाजता - पॅरा तिरंदाजी - पूजा (महिला व्यक्तिगत रिकर्व ओपन सेमीफायनल (जर क्वालिफाय झाले, तर)
१०:२८ वाजता - पॅरा तिरंदाजी - पूजा (महिला व्यक्तिगत रिकर्व ओपन कांस्य पदकासाठीचा सामना (जर क्वालिफाय झाले, तर)
१०:३८ वाजता - पॅरा अॅथलेटिक्स - दिप्ती जीवनजी महिला 400 मीटर टी20 फायनल (जर क्वालिफाय झाले, तर)
१०:४४ वाजता - पॅरा तिरंदाजी - पूजा (महिला व्यक्तिगत रिकर्व ओपन स्वर्ण पदकासाठीचा सामना (जर क्वालिफाय झाले, तर)
११:५० वाजता - पॅरा अॅथलेटिक्स - मरियप्पन टी, शैलेश कुमार आणि शरद कुमार (पुरुषांची उंच उडी- फायनल)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.