Tokyo Olympics खेळाडूंची राष्ट्रपती भवनात 'चाय पे चर्चा'

आज सायंकाळी ५ वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) हे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंसोबत 'चाय पे चर्चा' करतील.
Tokyo Olympics खेळाडूंची राष्ट्रपती भवनात  'चाय पे चर्चा'
Tokyo Olympics खेळाडूंची राष्ट्रपती भवनात 'चाय पे चर्चा' Saam tv news
Published On

दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) चहासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. आज सायंकाळी  ५ वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) हे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडू सोबत 'चाय पे चर्चा' करतील. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात चहा पार्टीचे आयोजन करण्यात आलय. (The President invited the Tokyo Olympics athletes for tea)

हे देखील पहा -

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंची कामगिरी पाहता आज राष्ट्रपती भवनात सर्व खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले आहे. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्रा नंतर नीरज दुसरा भारतीय ठरला.

Tokyo Olympics खेळाडूंची राष्ट्रपती भवनात  'चाय पे चर्चा'
अंबरनाथमध्ये रहिवासी भागाजवळ सुरू झालेल्या नव्या डम्पिंगमुळे नागरिक त्रस्त

तर, या ऑलिम्पिकमध्ये भारत 7 पदकांसह 48 वे स्थानावर राहिला. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी होती. यापूर्वी 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली होती. भारताकडून भालाफेकमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण, वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि पैलवान रवीकुमार दहिया यांनी रौप्य पदक पटकावले. तर शटलर पीव्ही सिंधू, कुस्तीपटू बजरंग पुनिया, बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन आणि पुरुष हॉकी संघाने कांस्यपदके जिंकली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळ संपले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी 8 ऑगस्ट रोजी टोकियोमध्ये 32 व्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या समाप्तीची घोषणा केली. समारोप सोहळ्यात कुस्तीपटू बजरंग पुनिया भारताचा झेंडा फडकवताना दिसला. आता 2024 मध्ये पॅरिसमध्ये ऑलिम्पिक खेळ आयोजित केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com