अंबरनाथमध्ये रहिवासी भागाजवळ सुरू झालेल्या नव्या डम्पिंगमुळे नागरिक त्रस्त

अंबरनाथमधील या नव्या डम्पिंग ग्राउंडमधून कचऱ्याची दुर्गंधी पसरू नये, यासाठी नगरपालिकेने उपायोजना करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
अंबरनाथमध्ये रहिवासी भागाजवळ सुरू झालेल्या नव्या डम्पिंगमुळे नागरिक त्रस्त
अंबरनाथमध्ये रहिवासी भागाजवळ सुरू झालेल्या नव्या डम्पिंगमुळे नागरिक त्रस्तअजय दुधाणे
Published On

अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेचं डम्पिंग मोरिवली पाड्यातून चिखलोलीच्या सर्व्हे क्रमांक १३२ वर स्थलांतरित झालंय. मात्र या नव्या डम्पिंगच्या बाजूला मोठी नागरी वस्ती असून त्यामुळं रहिवाशांना याचा त्रास होतोय. या डम्पिंगमधून कचऱ्याची दुर्गंधी पसरू नये, यासाठी नगरपालिकेने उपायोजना करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. (Citizens are distressed by the stench of new dumping near residential areas in Ambernath)

हे देखील पहा -

अंबरनाथ शहरातला कचरा गेल्या ६० ते ७० वर्षांपासून मोरिवली पाड्याजवळील एका खासगी जागेत अनधिकृतपणे टाकला जात होता. याविरोधात स्थानिकांनी अनेकदा आंदोलनं केली. तर या डम्पिंगच्या समोरच न्यायालयाची इमारत उभी राहिल्यानंतर न्यायालयानेही अंबरनाथ पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला होता. याची दखल घेत शासनाने अंबरनाथ पालिकेला डम्पिंगसाठी दिलेल्या चिखलोलीच्या सर्व्हे क्रमांक १३२ वर नवं डम्पिंग सुरू करण्यात आलं. मात्र या भूखंडाच्या बाजूलाच मोठी नागरी वस्ती आहे. या नव्या डम्पिंगमुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचा त्रास होऊ लागलाय.

अंबरनाथमध्ये रहिवासी भागाजवळ सुरू झालेल्या नव्या डम्पिंगमुळे नागरिक त्रस्त
मुंबई विद्यापीठात बाँम्ब स्फोट घडवून आणण्याची ई-मेलवरून धमकी

याबाबत या भागातील रहिवाशांनी आज अंबरनाथ पालिकेत येऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि डम्पिंगच्या दुर्गंधीची तक्रार केली. शासनाने दिलेल्या भूखंडावर सुरू केलेल्या डम्पिंगला विरोध नाही, मात्र त्याचा आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होऊ नये, याची काळजी अंबरनाथ नगरपालिकेने घ्यावी, अशी मागणी यावेळी रहिवाशांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी डम्पिंगवर जंतुनाशक फवारणी आणि अन्य उपायोजना करण्याचं आश्वासन नगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलं.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com