Paris Paralympics 2024: भारताचा डबल धमाका! एकाच इव्हेंटमध्ये मिळाले 2 मेडल

Dharamvir And Pranav Won Medal In Club Throw: भारताचे स्टार खेळाडू धरमवीर आणि प्रणवने शानदार कामगिरी करत पदक पटकावलं आहे.
Paris Paralympics 2024: भारताचा डबल धमाका! एकाच इव्हेंटमध्ये मिळाले 2 मेडल
dharamveer and pranavtwitter
Published On

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. जे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं, ते यावेळी भारतीय खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत करून दाखवलं आहे. रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत धरमवीर आणि प्रणवने सुवर्ण आणि रौप्य पदकाला गवसणी घातली आहे.

क्लब थ्रो च्या एफ 51 कॅटेगरीत धरमवीरने सुवर्ण पदक पटकावलं. तर प्रणवने रौप्य पदकाला गवसणी घातली. सर्बियाच्या दिनीत्रिजोविकला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.

खराब सुरुवात अन् दमदार शेवट

या प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या धरमवीरला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. सुरुवातीला त्याने ४ फाऊल थ्रो केले. त्यावेळी वाटलं होतं की, त्याचं आव्हान संपलं. मात्र पाचवा थ्रो त्याने ३४.९२ मीटर इतका लांब फेकला. या थ्रो ने त्याला सुवर्ण पदक जिंकून दिलं. त्यानंतर त्याने ३१.५९ मीटर लांब थ्रो केला.

Paris Paralympics 2024: भारताचा डबल धमाका! एकाच इव्हेंटमध्ये मिळाले 2 मेडल
Paris Paralympics 2024: सिंग इज किंग! Harvinder Singh ने गोल्डवर निशाणा साधत रचला इतिहास

प्रणवची चमकदार कामगिरी

एकीकडे धरमवीरला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. तर दुसरीकडे प्रणवने पहिलाच थ्रो ३४.५९ मीटर लांब केला. त्यानंतर दुसरा थ्रो ३४.१९ मीटर लांब फेकला. त्याचा तिसरा थ्रो फाऊल ठरला. या थ्रो ने त्याला रौप्य पदक जिंकून दिलं. या प्रकारात आणखी एका भारतीय खेळाडूने सहभाग घेतला होता. अमित कुमारने २३.९६ मीटर थ्रो केला. त्यामुळे पदकापासून वंचित राहावं लागलं. त्याला ही कांस्यपदक जिंकण्याची संधी होती. असं तर झालं असतं,आणखी एक मोठा रेकॉर्ड बनवला गेला असता.

Paris Paralympics 2024: भारताचा डबल धमाका! एकाच इव्हेंटमध्ये मिळाले 2 मेडल
Paris Paralympics 2024: मराठमोळा 'सचिन' पॅरिसमध्ये चमकला! सांगलीच्या पठ्ठ्यानं पटकावलं रौप्य पदक

भारतासाठी पाचवे सुवर्ण पदक

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक एकूण २४ पदकं जिंकली आहेत. ज्यामध्ये ५ सुवर्ण, ९ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे. यासह भारताने टोकियो पॅरालिम्पिकच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. या स्पर्धेतही भारताने ५ सुवर्ण पदकं पटकावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com