hardik-pandya saam tv news
Sports

Gujarat Titans Captain: हार्दिकने धरली मुंबईची वाट? हे ३ खेळाडू होऊ शकतात गुजरात टायटन्सचे कर्णधार

IPL 2024: हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडून खेळणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. दरम्यान कोण होऊ शकतो गुजरात टायटन्यचा कर्णधार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Hardik Pandya Replacement:

आयपीएल २०२४ स्पर्धेला लवकरच प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचा लिलाव सोहळा येत्या १९ डिसेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. रविवारी (२६ नोव्हेंबर) सर्व संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यादरम्यान हार्दिक पंड्या चर्चेचा विषय ठरतोय.

माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्स संघात एन्ट्री झाली आहे. पहिल्याच हंगामात गुजरातला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सने रिलीज केले आहे.हार्दिक जर गुजरातमधून बाहेर पडला, तर प्रश्न असा उपस्थित होतो की, कोण होणार गुजरातचा कर्णधार? आम्ही तुम्हाला ३ असे पर्याय सांगणार आहोत जे गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करु शकतात.

राशिद खान:

अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. हार्दिक कर्णधार असताना त्याने उपकर्णधाराची भूमिका बजावली आहे. तर हार्दिकच्या अनुपस्थितीत तो संघाचं नेतृत्व करताना दिसून आला आहे. त्यामुळे राशिद खान हा कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे.

केन विलियम्सन:

हार्दिकनंतर केन विलियम्सन हा गुजरातचं नेतृत्व करण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. यामागचं प्रमुख कारण असं की, गेली बरेच वर्ष तो न्यूझीलंड संघाचं नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने आयसीसीची फायनलही गाठली आहे.तसेच आयपीएल स्पर्धेत त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे तो या संघाचं नेतृत्व करण्यासाठी प्रबल दावेदार मानला जात आहे. (Latest sports updates)

शुभमन गिल:

हार्दिकच्या जागी कुठल्या भारतीय खेळाडूला कर्णधारपद द्यायचं असेल तर शुभमन गिल हा योग्य पर्याय आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याने फलंदाजीत धावांचा पाऊस पाडला आहे. मात्र त्याला नेतृत्वाचा अनुभव नाही. गिलला भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे गिलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. हार्दिक पंड्या जेव्हा कर्णधार बनला तेव्हा त्यालाही नेतृत्वाचा कुठलाही अनुभव नव्हता. तरीदेखील त्याने गुजरातला चॅम्पियन बनवलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT