Hardik Pandya in Gujarat Titans : ठरलं तर! हार्दिक पंड्या गुजरात टायटन्समधूनच खेळणार; मुंबई इंडियन्सकडे जाणार असल्याच्या अफवांना 'फुलस्टॉप'!

ipl auction 2024, Hardik Pandya in Gujarat Titans : गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियन्समध्ये जाणार असल्याच्या चर्चेला आणि त्यासंदर्भातील अफवांना पूर्णविराम मिळाला.
ipl auction 2024, Hardik Pandya in Gujarat Titans
ipl auction 2024, Hardik Pandya in Gujarat TitansSAAM TV
Published On

Hardik Pandya retained by Gujarat Titans, IPL 2024 Auction :

आयपीएल २०२४ मध्ये मोठे उलटफेर होणार असल्याच्या चर्चा होत्या. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियन्समध्ये जाणार असल्याची सर्वाधिक चर्चा होती. अखेर या चर्चेला आणि त्यासंदर्भातील अफवांना पूर्णविराम मिळाला.

इंडियन्स प्रीमिअर लीगच्या २०२४ च्या (IPL 2024) पर्वाच्या लिलावासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून अनेक अंदाज बांधले जात होते. हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियन्समध्ये जाणार असल्याची सर्वाधिक चर्चा होती. या सगळ्या चर्चा आज, रविवारी अखेर थांबल्या. पंड्या मुंबईकडून खेळणार असल्याच्या अफवा ठरल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुजरात टायटन्सला पहिलेच विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पंड्या हा नव्या पर्वातही याच संघातून खेळणार आहे. त्यामुळे त्याच्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना आपसुकच पूर्णविराम लागला. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडून खेळणार की गुजरात टायटन्समध्येच राहणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.

(Latest Marathi News)

ipl auction 2024, Hardik Pandya in Gujarat Titans
IPL Punjab Kings: प्रीती झिंटानं सोडली शाहरूखची साथ; पंजाब किंग्सच्या आयपीएल संघात मोठा उलटफेर

आयपीएल २०२४ साठी रविवारी संध्याकाळी लिलावाच्या आधीच सर्व संघांच्या रिटेन आणि रीलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर होणार होती. लिलावापूर्वी आपला संघ अंतिम करण्यासाठी प्रत्येकालाच डेडलाइन देण्यात आली होती.

रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सकडून अद्याप अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. मात्र, स्टार स्पोर्ट्सच्या आयपीएल रीटेन्शन शोमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला.

ipl auction 2024, Hardik Pandya in Gujarat Titans
Mushir Khan News: भावाच्या पावलावर पाऊल; मुंबईच्या स्फोटक फलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री; कोण आहे मुशीर खान?

रिटेन केलेले खेळाडू

रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, अर्जुन तेंडुलकर, जसप्रीत बुमराह, पीयूष चावला, आकाश मधवाल, डेवाल्ड ब्रेव्हिस, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, कॅमरन ग्रीन, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जेसन बेहरनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड.

रीलीज केलेले खेळाडू

अरशद खान, रमनदीप सिंह, राधव गोयल, संदीप वॉरियर, ऋतिक शौकिन, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्ज, दुयान यानसेन, झाय रिचर्डसन, रिले मेरिडिथ, क्रिस जॉर्डन.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com