Wazhma Ayoubi with shreyas iyer twitter
Sports

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरसोबत दिसणारी ती मिस्ट्री गर्ल कोण? टीम इंडियासोबत आहे खास कनेक्शन

Shreyas Iyer With Wazhma Ayoubi: सध्या सोशल मीडियावर श्रेयस अय्यरसोबत एका मिस्ट्री गर्लचा फोटो तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

बीसीसीआयचा कॉन्ट्रॅक्ट गेला, भारतीय संघात स्थान मिळणं कठीण झालं आणि जोरदार टीकाही झाली. मात्र श्रेयस अय्यरने आपल्या कामगिरीने सर्वांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपद मिळवून दिलं आहे. त्यानंतर सर्वच स्तरातून त्याचं कौतुक केलं जात आहे. दरम्यान या विजयानंतर सोशल मीडियावर त्याचे काही फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

एक फोटो तुफान व्हायरल होतोय ज्यात श्रेयस अय्यरसोबत अफगाणिस्तानची जबरा क्रिकेट फॅन वाजमा अयुबी असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान ही वाजमा अयुबी नक्की आहेत तरी कोण ? जाणून घ्या.

वाजमा अयुबी ही अफगाणिस्तानची कट्टर क्रिकेट समर्थक आहे. ती अनेकदा अफगाणिस्तान संघाला समर्थन करताना दिसून आली आहे. यासह ती भारतीय क्रिकेट संघाला देखील समर्थन करताना दिसून आली आहे.

केवळ आंतरराष्ट्रीय सामने नव्हे, तर आयपीएल सामने पाहण्यासाठीही ती भारतात येत असते. सध्या ती मॉडेलिंगमध्ये आपलं करियर करत आहे. ती दुबईत राहत असली तरी कामानिमित्त ती भारतात येत जात असते.

कोलकाताचा शानदार विजय

आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनल सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली.

या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचा डाव ११३ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने एकतर्फी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Beed Crime: वेळेवर पैसे देता येत नसेल तर तुझी बायको...; सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; बीड हादरले

Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

SCROLL FOR NEXT