IPL Final Toss, Shreyas Iyer: टॉस हैदराबादने जिंकला; मात्र चर्चा होतेय श्रेयस अय्यरची, नेमकं काय घडलं?

SRH vs KKR, Shreyas Iyer Viral Toss Video: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायर्स हैेदराबाद या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यातील श्रेयस अय्यरने असं काही केलं, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
IPL Final Toss, Shreyas Iyer: टॉस हैदराबादने जिंकला; मात्र चर्चा होतेय श्रेयस अय्यरची, नेमकं काय घडलं?
shreyas iyer no look coin flipsaam tv news

चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानावर आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना सुरु आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने क्वालिफायर १ च्या सामन्यात सनराय़झर्स हैदराबाद संघाला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर सनरायझर्स हैदराबादने क्वालिफायर २ सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत करत फयनलचं तिकीट मिळवलं. दरम्यान या सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आपल्या हटके स्टाईलमुळे चर्चेत आला आहे.

फायनलच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून श्रेयस अय्यर तर सनरायझर्स हैदराबादकडून पॅट कमिन्स नाणेफेक करण्यासाठी आला. श्रेयस अय्यरने नाणेफेक केली. मात्र त्याने केलेली नाणेफेक ही चर्चेचा विषय ठरली आहे. त्याने नो लुक टॉस केला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तसेच नेटकरी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

IPL Final Toss, Shreyas Iyer: टॉस हैदराबादने जिंकला; मात्र चर्चा होतेय श्रेयस अय्यरची, नेमकं काय घडलं?
IPL 2024 Final, KKR vs SRH: अब की बार KKR ? की SRH मारणार बाजी? वाचा कोण कोणावर पडणार भारी

या सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला. नाणेफेत जिंकताच कर्णधार पॅट कमिन्सने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याआधीही सनरायझर्स हैदराबादने जेव्हा जेव्हा नाणेफेक जिंकलं आहे, तेव्हा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर कर्णधार श्रेयस अय्यरला विचारलं असता, त्यावेळी तो म्हणाला की, आम्हाला नाणेफेक जिंकून गोलंदाजीच करायची होती.

IPL Final Toss, Shreyas Iyer: टॉस हैदराबादने जिंकला; मात्र चर्चा होतेय श्रेयस अय्यरची, नेमकं काय घडलं?
IPL 2024 च्या Closing Ceremony मध्ये अमेरिकन बँडचा धुरळा; सामन्याआधी क्रिकेटप्रेमींसाठी होणार खास माहोल

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

कोलकाता नाईट रायडर्स-

सुनील नरेन, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क ,वैभव अरोरा,

केकेआर इम्पॅक्ट प्लेअर्स: अनुकुल रॉय, मनीष पांडे, शेरफेन रदरफोर्ड, नितीश राणा, केएस भरत,

सनरायझर्स हैदराबाद-

ट्रॅव्हिस हेड, भिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट,

इम्पॅक्ट प्लेअर्स -अब्दुल समद, मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com