who is grandmaster d gukesh know in marathi amd200 twitter
Sports

D Gukesh Success Story: मुलाच्या यशामागे आई- वडिलांचा प्रचंड मोठा त्याग! पाचवीनंतर शाळेत न गेलेल्या गुकेशची यशोगाथा

Who Is D Gukesh: वयाच्या १७ व्या वर्षी बुद्धिबळविश्वात मोठा रेकॉर्ड करणारा डी गुकेश आहे तरी कोण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

डी गुकेश हे नाव सध्या तुफान चर्चेत आहे. चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे, या पठ्ठ्याने वयाच्या १७ व्या वर्षी बुद्धिबळविश्वात मोठा रेकॉर्ड करून दाखवला आहे. डी गुकेशला घडविण्यात त्याच्या आई वडिलांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मुलाचं स्वप्नं पूर्ण करायचं म्हणून त्यांनी आपली आयुष्यभराची सर्व पुंजी रिकामी केली.

गुकेशच्या आई वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, त्याचे वडील रजनीकांत हे कान-नाक- घसा तज्ञ आहेत. तर आई सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहे. बुद्धिबळ स्पर्धा खेळायच्या म्हणून जगभरात प्रवास करायला लागायचा. त्यामुळे गुकेशसोबत कोणीतरी हवं होतं. २०१७-१९ मध्ये गिकेश गुकेशच्या वडिलांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी डॉक्टरी व्यवसाय थांबवला. वयाच्या १२ व्या वर्षी गुकेश ग्रँड मास्टर झाला. त्यावेळी घरखर्च त्याच्या आईच्या कमाईवर सुरू होता.

गुकेशची सक्सेस स्टोरी त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक विष्णू प्रसन्ना यांनी सांगितली. डॉक्टर कुटुंबात जन्माला आलेल्या गुकेशला लहानपणापासूनच बुद्धिबळाची ओढ होती. आपल्या मुलाचं पॅशन आणि या खेळाप्रती असलेली आवड पाहून त्याच्या वडिलांनी त्याला या खेळात कारकिर्द घडवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. बुद्धिबळ खेळायला सुरुवात केल्यापासून तो शाळेत गेलाच नाही. पाचवी झाल्यानंतर त्याने शाळेत जाणंच सोडून दिलं. यापुढे तो आपलं शिक्षण पूर्ण करेल की नाही, याबाबत शंका आहे. मात्र त्याबद्दल त्याची आई मात्र चिंतेत असल्याचं प्रसन्ना यांनी म्हटलं आहे.

बुद्धिबळविश्वात स्वत:चा ठसा उमटवत असलेल्या गुकेशला अजूनही स्वखर्चावर स्पर्धा खेळण्यासाठी जावं लागत आहे. १७ वर्षीय गुकेशला अजूनगी प्रायोजक मिळालेला नाही. वयाच्या ७ व्या वर्षी त्याने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्यानंतर २०१७ मध्ये त्याची आणि प्रसन्ना यांची भेट झाली. इथून त्याचा प्रवास सुरु झाला आणि अवघ्या २ वर्षात कमाल कामगिरी करत तो ग्रँडमास्टरही झाला. असं प्रसन्ना म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले की, ' कोरोनापर्यंत आम्ही कठोर मेहनत घेत होतो. त्यानंतर कोरोना काळात आम्ही विश्वनाथन आनंद यांच्या अकादमीत होतो. तेव्हा मिळालेल्या वेळेचा पुरेपूर उपयोग केला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT