क्रिकेटमध्ये एक काळ असा आला होता जेव्हा सचिन तेंडुलकर हे नाव जरी घेतलं तरी मोठ-मोठ्या गोलंदाजांना घाम फुटायचा. केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजींमध्येही सचिनने एक वेगळा ठसा उमटवला. फार कमी लोकांना ठाऊक असेल की, सचिन तेंडुलकर पहिल्यांदा गोलंदाज बनणार होता. मात्र ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज डेनिस लिलीच्या सल्ल्यानंतर त्याने फलंदाजीलर लक्ष केंद्रीत केलं.
सचिनच्या गोलंदाजीच्या एक किस्सा फार कमीच लोकांना माहिती असेल. तो म्हणजे सचिनने एका सामन्यात बाऊंसर टाकला होता. हा बाऊंसर इतका घातक होता की समोरच्या फलंदाजाचं नाक फुटलं होतं. २० एप्रिल १९९१ मध्ये दिल्ली विरूद्ध मुंबई यांच्यामध्ये झालेल्या रणजी सामन्यात ही घटना घडली होती.
या सामन्यामध्ये दिल्लीच्या दुसऱ्या सिझनमध्ये सचिन तेंडुलकरचा शॉर्ट पीच बॉल बंटू सिंहला लागला होता. बंटू १९८० आणि ९० च्या दशकातील दिल्लीचा सर्वोत्तम फलंदाज मानला जायचा. हा बॉल इतका घातक होता की बंटूच्या नाकातून रक्तही येऊ लागलं. या प्रकरणानंतर बंटूला ग्राऊंडच्या मागे असलेल्या संजीवनी रूग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी त्याचं नाक फ्रॅक्टर असल्याचं समोर आलं. तेव्हा बंटूच्या नाकावर सर्जरी देखील करावी लागली.
बंटू सिंह याची आठवण काढताना म्हणाले की, माझ्या नाकाचा आकारच बदलला होता. तेंडुलकरच्या त्या बाऊंसरनंतर माझ्याकडे एक नवं नाक असल्याचं मी म्हणतो. त्या सामन्यामध्ये पीचच असं होतं ज्यामुळे गोलंदाजांना बाऊंसर टाकण्यास मदत मिळत होती.
बंटू सिंह यांनी पुढे सांगितलं की, मात्र तेव्हा सचिन माणूसकी विसरला नाही. मुंबईची टीम सामना संपल्यानंतर घरी परतली. मात्र त्याचदिवशी रात्री जवळपास ११ वाजता माझ्या घरी फोन आला जो माझ्या वडिलांना उचलला. तो फोन सचिनने केला होता. मला माहिती नाही त्याने माझ्या घरचा नंबर कसा शोधला. त्याने वडिलांना माझ्या तब्येतीबाबत विचारलं. शिवाय डॉक्टर काय म्हणाले हे देखील त्याने विचारलं. त्यानंतर जेव्हाही आम्ही भेटलो तेव्हा तो, माझं नाक बरं आहे का, असं विचारायचा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.