
Viral Video: दिल्ली मेट्रो हे देशातील एक महत्त्वाचे आणि सर्वाधिक वापरले जाणारे सार्वजनिक वाहतूक माध्यम मानले जाते. रोज लाखो प्रवासी यामार्फत प्रवास करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली मेट्रोमध्ये घडणाऱ्या विचित्र आणि असभ्य घटनांमुळे ही सेवा चर्चेचा विषय बनली आहे. अगदी अलीकडेच पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे, ज्यामध्ये दोन महिलांमध्ये झालेला वाद चांगलाच बहरला आणि अखेर त्या एकमेकींवर ओरडू लागल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल(Viral) झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की दिल्ली मेट्रोच्या एका कोचमध्ये दोन महिला एकमेकींशी जोरजोरात भांडताना दिसतात. सुरुवातीला वाद फक्त तोंडाने होता, पण काही वेळात एकमेकींना ढकलणे, हात उगारणे आणि अपशब्द वापरणे अशा कृत्यांपर्यंत तो पोहोचतो. या घटनेमुळे संपूर्ण कोचमधील प्रवासी अस्वस्थ झाले आणि काहींनी हे सर्व मोबाईलमध्ये चित्रीत केलं
या प्रकारात भांडण नेमकं कशामुळे सुरु झालं याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही, पण काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की दोघींमध्ये सीटवरून वाद सुरु झाला होता, जो पुढे वाढत गेला. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील delhi.connection या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.
हा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून नेटकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. अनेकांनी दिल्ली मेट्रोमधील वाढत्या असभ्यतेवर आणि प्रवाशांच्या शिस्तभंगावर चिंता व्यक्त केली आहे तर काही नेटकऱ्यांनी म्हटलं की,''या महिला कधीच शांत बसणार नाहीत'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.