Dhanshri Shintre
अत्याधिक प्रोटीन सेवन केल्यास पचनसंस्थेवर ताण येतो आणि बद्धकोष्ठता, अतिसार, पोट फुगण्यासारख्या त्रास होऊ शकतात.
अधिक प्रोटीन घेतल्यास मूत्रपिंडांवर ताण येतो, त्यामुळे किडनी स्टोन आणि अन्य आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
अतीप्रमाणात प्रोटीन घेतल्यास शरीरात पाणी कमी होऊन डिहायड्रेशन, थकवा आणि चक्कर यांसारखे त्रास निर्माण होतात.
लाल मांसासारखे उच्च प्रोटीन असलेले अन्न पदार्थ हृदयावर ताण देऊन हृदयरोगाचा धोका वाढवू शकतात.
प्रोटीन पचताना नायट्रोजन तयार होतो, जो यकृतावर ताण आणतो आणि यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतो.
जास्त प्रोटीन सेवन केल्यास काही व्यक्तींना डिहायड्रेशनमुळे डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो, असा अनुभव आहे.
पुरेसे प्रोटीन घेतल्यावरही अतिरिक्त प्रोटीन सेवन केल्यास शरीरात अनावश्यक चरबी जमा होऊन वजन वाढू शकते.
प्रोटीन पचवताना तयार होणाऱ्या रासायनिक घटकांमुळे तोंडातून दुर्गंधी येण्याची शक्यता वाढते, असे संशोधनात दिसून आले आहे.