ind vs pak twitter
क्रीडा

World Championship Of Legends: भारत- पाकिस्तानात रंगणार फायनलचा सामना! सामन्याची वेळ अन् कुठे पाहता येणार लाईव्ह?

Ankush Dhavre

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना आज (१३ जुलै) बर्मिंघहॅममध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर पाकिस्तानने वेस्टइंडिजला पराभूत करत स्पर्धेची फायनल गाठली आहे. या दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळू शकते.

भारतीय संघाचा शानदार विजय

या स्पर्धेतील सेमिफायनलच्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना २५४ धावांचा डोंगर उभारला. नॉकआऊट सामन्यात युवराज सिंगची बॅट चांगलीच तळपते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात युवराज सिंग, रॉबिन उथप्पा आणि पठाण बंधूंनी अर्धशतकी खेळी केली. भारतीय संघाने दिलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १६८ धावांवर आटोपला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनलचा सामना केव्हा आणि कुठे रंगणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनलचा सामना शनिवार १३ जुलै रोजी बर्मिंघहॅममध्ये खेळला जाणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनलचा सामना किती वाजता सुरु होईल?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनलचा सामना स्थानिक वेळेनुसार, संध्याकाळी ४ वाजता सुरु होणार आहे. तर भारतीय वेळेनुसार, हा सामना रात्री ९ वाजता सुरु होईल. दोन्ही कर्णधार सामना सुरु होण्याच्या अर्ध्या तासापूर्वी मैदानावर येतील.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनलचा सामना लाईव्ह कुठे पाहता येईल?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनलचा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येईल. यासह हे सामने तुम्ही फॅनकोडवर फ्री मध्ये पाहू शकता.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघाचा स्क्वाड:

रॉबिन उथप्पा (यष्टीरक्षक), अंबाती रायडू, सुरेश रैना, युवराज सिंग (कर्णधार), यूसुफ पठान, इरफान पठान, गुरकीरत सिंग मान, पवन नेगी, विनय कुमार, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी, राहुल शुक्ला, आरपी सिंग, नमन ओझा, सौरभ तिवारी, अनुरीत सिंग, राहुल शर्मा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur News : नागपूरमध्ये हेराफेरी! इस्रो आणि नासाचं ऑफिस उघडले, १११ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे दिली, ५ कोटी उकळले!

BIS Recruitment: भारतीय मानक ब्युरोमध्ये नोकरीची संधी; मिळणार ७५००० रुपये पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Raj Thackrey :''.. मग आधी पालिका निवडणुका घ्या!'', राज ठाकरेंची पोस्ट

IPL 2025 Auction: IPL 2025 स्पर्धेचं ऑक्शन केव्हा अन् कुठे होणार? मोठी अपडेट आली समोर

Pant vs Litton Das: भाई, मला का मारतोय? भर मैदानात पंत-लिटन दासमध्ये राडा, नेमकं काय घडलं, पाहा Video

SCROLL FOR NEXT