gautam gambhir statement on kohli rohit saam tv
Sports

Gautam Gambhir: वनडे सिरीज जिंकल्यानंतर विराट-रोहितबद्दल काय म्हणाला गौतम गंभीर? IPL टीमच्या मालकांनाही सुनावले खडे बोल

gautam gambhir statement on kohli rohit: भारताने वनडे मालिका जिंकल्यानंतर मुख्य कोच गौतम गंभीर यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माच्या कामगिरीचे कौतुक केलंय.

Surabhi Jayashree Jagdish

तिसऱ्या आणि शेवटच्या निर्णायक सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने वनडे सिरीजही जिंकली. या विजयानंतर भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याविषयी वक्तव्य केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या सिरीजमध्ये त्यांनी तेच केलं जे ते इतक्या वर्षांपासून करत आलेत, असं गंभीर म्हणालाय.याशिवाय गंभीरने आशा व्यक्त केलीये की, हे दोघे पुढेही टीमसाठी असंच योगदान देत राहतील.

दरम्यान गंभीरचं हे व्यक्तव्य भारताने विशाखापट्टणममध्ये दक्षिण आफ्रिकेला नऊ विकेट्स राखून पराभूत करून सिरीज 2-1 ने जिंकल्यानंतर आली. गंभीरने असं म्हणताच भारतीय चाहत्यांसाठी मोठा दिलासा मिळालाय. टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये मतभेद असल्याची चर्चा होती मात्र गंभीरच्या या वक्तव्याने या चर्चांना पूर्णविराम लागलाय.

गंभीर यांचे रोहित-कोहलीवर विधान

काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, गंभीर, कोहली आणि रोहित यांच्यात संवाद कमी झाला होता. विशेषतः तेव्हापासून ज्यावेळी ही स्टार जोडी फक्त दोन फॉर्मेट्स (टेस्ट आणि वनडे) मध्ये खेळत होती. गंभीरने माध्यमांशी बोलताना सांगितलं, "या दोघींना तेच केलं जे ते नेहमी करतात. ते भारतीय क्रिकेटसाठी इतक्या वर्षांपासून असाच खेळ करत आलेत. आशा आहे की ते असेच करत राहतील."

कोहली आणि रोहित 2027 च्या वर्ल्डकपसाठी स्थान पक्कं करण्यासाठी खूप मेहनत घेतायत. मात्र त्या वर्षी दोघांचं वय जवळपास 40 असणार आहे. ही बाब कदाचित गंभीरच्या कठोर भूमिकेच्या विरोधात जाऊ शकते. रोहितने गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये 'प्लेयर ऑफ द सीरीज' हा किताब जिंकला होता. तर कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन शतकांसह 300 पेक्षा जास्त रन्स करून हाच पुरस्कार मिळवला.

तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यानंतर गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तो म्हणाले, “टेस्ट सिरीजमधील निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे आला नाही तेव्हा खूप चर्चा झाली. पण आश्चर्याची बाब म्हणजे कुठल्याही माध्यमाने हे अधोरेखित केलं नाही की, आमचा पहिला टेस्ट सामना कर्णधाराशिवाय खेळला गेला होता.”

दरम्यान गंभीरने दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदल यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. टेस्ट सिरीजमध्ये पराभवानंतर जिंदल यांनी टेस्ट आणि मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक असावेत अशी मागणी केली होती. यावर गंभीर म्हणाला, “एका IPL टीच्या मालकाने स्प्लिट कोचिंगबद्दल लिहिलं. हे खरंच आश्चर्यकारक आहे. प्रत्येकाने एका मर्यादेत राहणं गरजेचं आहे. आम्ही जर इतरांच्या कामात हस्तक्षेप करत नसू, तर त्यांनीही आमच्या बाबतीत टिप्पणी करू नये.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 Grand Finale: फिनाले मधला चौथा स्पर्धक बाहेर; तान्या मित्तलची बिग बॉसच्या घरातून एक्झिट

Nashik Accident : सप्तश्रृंगी गडावरून कार दरीत कोसळली, ६ भाविकांचा मृत्यू

...तर त्या पक्षाचा सत्यानाश होतो; केंद्रीय मंत्री आठवलेंनी सांगितला ३५ वर्षांचा इतिहास

हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा होणार; १८ विधेयके मांडली जाणार, लाडकी बहीण योजनेवरही फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Bigg Boss 19: 'सलमान खानसोबत स्टेज शेअर करू नको...'; प्रसिद्ध अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई गँग कडून धमकी

SCROLL FOR NEXT