

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील वनडे सिरीज आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलीये. उद्या विशाखापट्टणममध्ये होणारा तिसरा आणि शेवटचा सामना दोन्ही टीमसाठी ‘करो या मरो’ ठरणार आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर भारताला दुसऱ्या वनडे सामन्यात पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने 359 रन्सचं डोंगरासारखं लक्ष्य सहज गाठलं. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया प्लेईंग ११ मध्ये काही बदल करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरताना दिसली. विशेषतः वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा. प्रसिद्ध कृष्णाने 8.2 ओव्हरमध्ये तब्बल 85 रन्स दिले आणि एकही विकेट घेतली नाही.
संपूर्ण सिरीजमध्ये त्याचा खेळ साधारणच राहिलाय. त्याच्या या कामगिरीमुळे आता निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटसमोर टीममध्ये बदल करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे तिसऱ्या वनडेमध्ये प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध कृष्णाच्या जागी युवा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डीला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. नितीश रेड्डी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. डेथ ओव्हर्समध्ये चांगले रन्स करण्याबरोबरच विकेट घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. विशाखापट्टणमची खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे असा ऑलराउंडर हवा जो फलंदाजी करेलल आणि गोलंदाजीसाठीही पर्याय ठरेल.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाला शेवटच्या ओव्हर्समध्ये रन्स करण्यात अडचण आली होती. अशा वेळी नितीश रेड्डीचा समावेश भारतीय फलंदाजीला एक आधार देण्यात मदत करेल.
जर प्रसिद्ध कृष्णाला बाहेरचा रस्ता दाखवला तर गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंह, हर्षित राणा, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी यांचा समावेश असेल.
रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, रुतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (कर्णधार ), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.