

रविवारी झालेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे सामन्यात विराट कोहलीने सेंच्युरी झळकावली. 52वे वनडे शतक झळकावून टीकाकारांना गप्प केलं. त्यावेळी फक्त चाहतेच नव्हे तर भारतीय डगआउटमध्येही खेळाडू कोहलीच्या शतकाचा आनंद साजरा करत होते. टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माला देखील प्रचंड आनंद झाला. यावेळी तो टाळ्या वाजवत काहीतरी बोलत होता.
अनेकांनी अंदाज लावला की, रोहितने आनंदाच्या भरात शिवीही दिली. पण रोहित शर्मा नेमकं काय बोलला हे स्पष्ट झालं नव्हतं. सेंच्युरीचा आनंद साजरा करताना रोहितच्या बाजूला अर्शदीप सिंह उभा होता. यानंतर आता एका व्हिडिओमध्ये अर्शदीप सिंहने या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
रांचीमध्ये कोहलीने अप्रतिम खेळ करत 120 बॉल्समध्ये 11 चौकार आणि 7 षटकारांसह 135 रन्स केले. यामुळे भारताने 349 रन्सचा मोठा स्कोअर उभारला. शिवाय यावे कोहलीने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी 136 रन्सची भागीदारी केली. या दोन दिग्गजांनी गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरत मास्टरक्लास दाखवला. रोहितच्या विकेटनंतर कोहलीच्या शतकावर तो अतिशय उत्साहित दिसत होता. यावेळी त्याने दिलेली रिएक्शन व्हायरल झालीये.
गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर रोहितने नेमके काय म्हटलं याचा शोध चाहत्यांकडून घेतला जातो. अखेर अर्शदीपने यावर उत्तर दिलंय, पण मजेशीर अंदाजात. त्याने नेमके शब्द सांगण्याचं टाळलं
अर्शदीपने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने म्हटलंय की, “मला अनेक मेसेज येतायत की रोहितने विराटच्या शतकानंतर काय म्हटलं. तर मी सांगतो की रोहित म्हणाला, ‘नीली परी, लाल परी, कमरे में बंद, मुझे नादिया पसंद.’” ही क्लिप नंतर पंजाब किंग्सने इंस्टाग्रामवर पोस्ट केली.
या वर्षाच्या सुरुवातीला रोहित आणि विराटने टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय भविष्यावर आणि 2027 वर्ल्ड कपमधील खेळण्यावर पुन्हा चर्चा सुरू आहे. काही अहवालांनुसार, त्यांना विजय हजारे ट्रॉफी खेळण्यास सांगितलं जाऊ शकतं, जेणेकरून त्यांची लय कायम राहील.
तर दुसऱ्या अहवालात असं नमूद करण्यात आलं की, बीसीसीआय अधिकारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यासोबत बैठक घेऊन या दोन्ही दिग्गजांच्या भविष्यावर निर्णय घेणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.