Rohit Sharma: कोहलीच्या शतकानंतर रोहितची भन्नाट रिअ‍ॅक्शन; आनंदाच्या भरात केलं असं की...! Video झाला व्हायरल

rohit sharma reaction kohli century video viral: पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आणि त्यानंतर रोहित शर्माने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
rohit sharma reaction kohli century video viral
rohit sharma reaction kohli century video viralsaam tv
Published On

टेस्ट सिरीजनंतर आता भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे सिरीजला सुरुवात झाली आहे. रांचीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अप्रतिम खेळ केला. अशातच विराट कोहलीच्या 52व्या शतकावर माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माची जबरदस्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली.

मार्को यान्सेनच्या गोलंदाजीवर विराटने चौकार मारत सेंच्युरी ठोकली. जेव्हा विराटने चौकार मारला तेव्हा काही कॅमेरे रोहित शर्माकडे वळले. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये बसलेला रोहित शर्मा उड्या मारताना, टाळ्या वाजवताना दिसला. इतकंच नाही तर रोहित शर्मा इतका जोशात शिवीही दिली. हा क्षण लगेचच व्हायरल झाला.

rohit sharma reaction kohli century video viral
IND vs SA: टेस्टमधील दारूण पराभवानंतर कोचपदावरून गंभीरची हकालपट्टी? अखेर बीसीसीआयने दिलं उत्तर

दोघांची शतकी भागीदारी

या सामन्यात रोहित आणि कोहली यांनी मिळून 136 रन्सची शानदार पार्टनरशिप केली. जी वनडे क्रिकेटमधील त्यांची 20वी शतकी भागीदारी ठरली. हे शतक कोहलीचं रांचीतील तिसरं आणि एकूण 52वे वनडे शतक होतं. यामुळे त्याने एका फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला (51 टेस्ट शतक) मागे टाकलंय.

काही महिन्यांपासून विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्यासंदर्भात चर्चा सुरू होती. पण रांचीतील त्यांची बॉन्डिंग पाहून स्पष्ट झालंय की, मैदानावर त्यांचं नाते पूर्वीपेक्षा अधिक खास आणि मैत्रीपूर्ण झालंय.

rohit sharma reaction kohli century video viral
Ind vs Sa: रोहित आणि विराटने अर्धशतकानंतर केलं सारखंच सेलिब्रेशन; दोघांच्याही सेलिब्रेशनचा रोख नेमका कोणाकडे?

कोहली-रोहितची खेळी

कोहलीने 120 चेंडूंमध्ये 135 रन्सची धमाकेदार खेळी केली. ज्यामध्ये 11 चौकारे आणि 7 षटकारांचा समावेश होता. तर रोहितनेही 57 रन्सची खेळी करत शाहिद आफ्रिदीच्या सर्वाधिक वनडे षटकारांच्या (351) विक्रमाला मागे टाकलंय. रोहितने 352वा षटकार ठोकला.

rohit sharma reaction kohli century video viral
Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या 16 षटकारांचं वादळ; 32 चेंडूत शतक ठोकून रचला इतिहास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com