KL Rahul: 358 रन्स करूनही भारताच्या पदरी पराभवच; 'या' खेळाडूंवर केएल राहुलने फोडलं खापर, म्हणाला, मी स्वतःला दोष देतोय कारण...!

Kl rahul reaction after india defeat: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात तब्बल ३५८ रन्स करूनही टीमला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर कर्णधार के.एल. राहुलने खेळाडूंवर नाराजी व्यक्त केलीये.
Kl rahul reaction after india defeat
Kl rahul reaction after india defeatSAAM TV
Published On

पहिल्या वनडे सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाला दुसऱ्या वनडेमध्ये पराभवाची चव चाखाली लागली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा ४ विकेट्सने पराभव झाला. त्यामुळे ३ सामन्यांच्या वनडे सिरीजमध्ये आता १-१ अशी बरोबरी झाली आहे. दरम्यान भारतीय कर्णधार के एल राहुलचं मत आहे की, हा पराभव पचवणं कठीण नाही कारण दुसऱ्या डावात दव पडल्यामुळे गोलंदाजी करणं अवघड झालं होतं.

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममद्ये भारताने 5 विकेट्स गमावून 358 रन्स केले होते. दरम्यान यानंतर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 49.2 ओव्हर्समध्ये विजय मिळवला.

Kl rahul reaction after india defeat
IND vs SA: आता तरी जिंकूदे! टॉस जिंकण्यासाठी केएल राहुलने वापरला खास टोटका, तरीही पदरी निराशाच; पाहा नाण्यासोबत कर्णधाराने काय केलं?

पराभवानंतर काय म्हणाला के एल राहुल?

दक्षिण आफ्रिकेकडून 4 विकेट्सने सामना गमावल्यानंतर केएल राहुल म्हणाला की, दुसऱ्या डावात दव पडलं होतं आणि गोलंदाजी करणं किती कठीण होतं. अंपायर चांगले होते आणि त्यांनी चेंडू बदलला. यामध्ये टॉस ही खूप मोठी भूमिका बजावतो.

दरम्यान राहुल हसत हसत म्हणाला की, “मी टॉस हरल्याबद्दल स्वतःलाच दोष देतोय.”

राहुल पुढे म्हणाला की, गोलंदाज आणि फिल्डर आणखी चांगला खेळ करू शकले असते. नेहमी काही गोष्टी अशा असतात ज्या आपण अधिक चांगल्या करू शकतो. फलंदाजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला माहितीये की, 350 रन्स चांगले होते. गेल्या सामन्यानंतरही ड्रेसिंग रूममध्ये हीच चर्चा होती की दव पडल्यानंतर चेंडू ओला झाल्यावर गोलंदाजांना मदत करण्यासाठी आणखी 20-25 रन्स कसे करू शकतो.”

Kl rahul reaction after india defeat
Gautam gambhir: गौतम गंभीरच्या कोचिंगचा मुद्दा पोहोचला सुप्रीम कोर्टात; टेस्ट सिरीजमध्ये झालेल्या पराभवावर जजने दिलेलं रिएक्शन VIRAL

गायकवाड-कोहली पार्टनरशिपवर दिली प्रतिक्रिया

गायकवाड आणि कोहली यांच्यातील 195 रन्सच्या भागीदारीबद्दल राहुल म्हणाला, “ऋतुराजने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहून खूप आनंद झाला. विराट कोहलीला आपण 53 वेळा शतक करताना पाहिलंय. तो नेहमी त्याचं काम चोख करत राहतो. ऋतुराजला फलंदाजी करताना पाहणं खूप छान होतं.”

Kl rahul reaction after india defeat
IND vs SA: रायपूरमध्ये टीम इंडियाची नवी रणनीती? प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com