Gautam gambhir: गौतम गंभीरच्या कोचिंगचा मुद्दा पोहोचला सुप्रीम कोर्टात; टेस्ट सिरीजमध्ये झालेल्या पराभवावर जजने दिलेलं रिएक्शन VIRAL

gautam gambhir coaching supreme court test series defeat viral: अलीकडील टेस्ट मालिकेतील पराभवानंतर या विषयावर मोठी चर्चा सुरू झाली असून, न्यायाधीशांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
gautam gambhir coaching
gautam gambhir coachingSAAM TV
Published On

नुकतंच टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टेस्टमध्ये दारूण पराभव झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर देखील मुख्य कोच गौतम गंभीरवर टीका केली जातेय. टीम इंडियाचा घरच्या मैदानावरील टेस्ट पराभवाचा मुद्दा थांबण्याचं नाव घेत नाही. दरम्यान याचे पडसाद कोर्टातही पडले आहे. आता याचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयातही झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांनी एका सुनावणीदरम्यान टीम इंडियाच्या अलीकडील टेस्ट क्रिकेटमधील खराब कामगिरीचा अनौपचारिक उल्लेख केला. वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्याशी संवाद साधताना न्यायमूर्ती सुंदरेश यांनी म्हटलंय की, व्हाईट बॉल क्रिकेटवर जास्त लक्ष दिल्यामुळे भारतीय टेस्ट टीमच्या कामगिरीत घसरण झाली आहे.

टेस्टमध्ये भारताची खराब कामगिरी

न्यायमूर्ती सुंदरेश यांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेने दोन टेस्ट सामन्यांच्या घरच्या मालिकेत क्लीन स्वीप दिलं. गेल्या 13 महिन्यांत ही दुसरी वेळ होती जेव्हा भारताला एखाद्या परदेशी टीमने घरच्या मैदानावर पराभूत केलं. दोन्ही वेळा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यकाळात हे घडलंय. त्यामुळे टेस्ट संघाच्या कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रीत झालंय.

gautam gambhir coaching
IND vs SA: रायपूरमध्ये टीम इंडियाची नवी रणनीती? प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ

न्यायमूर्तींनी केलेली ही टिप्पणी मंगळवारी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. व्हिडिओमध्ये ते म्हणतायत की, “ज्यावेळी तुम्ही T20 आणि ODI वर जास्त लक्ष देता, तेव्हा तुम्ही टेस्ट सामने हराल.” ही त्यांची अनौपचारिक चर्चा होती जी कॅमेऱ्यात कैद झाली.

मुकुल रोहतगी यांचा खुलासा

सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितलं की, त्यांनी टेस्ट सिरीज हरल्यानंतर अलीकडेच गौतम गंभीर यांच्याशी चर्चा केली होती. ते म्हणाले, “लॉर्डशिप, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर माझे मित्र आणि क्लाएंट दोन्ही आहेत. मी त्यांना फोन करून सांगितलं की, आता संपूर्ण देश म्हणतोय की, जर तुम्ही स्वतःच्या पिचवर अशा प्रकारे हरत असाल, तर तुम्ही थांबलं पाहिजे.”

gautam gambhir coaching
Rohit Sharma: कोहलीच्या शतकानंतर रोहितची भन्नाट रिअ‍ॅक्शन; आनंदाच्या भरात केलं असं की...! Video झाला व्हायरल

भारताची सध्याची स्थिती

भारतीय क्रिकेट टीम सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे सिरीज खेळतेय. मात्र पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. आता टीम दुसऱ्या वनडेसाठी रायपूरला पोहोचली आहे. त्यानंतर अंतिम वनडे सामना विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे. वनडे सिरीज संपल्यानंतर भारत टी20 वर्ल्डकप 2026च्या तयारीचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 सिरीज खेळणार आहे.

gautam gambhir coaching
Ind vs Sa: रोहित आणि विराटने अर्धशतकानंतर केलं सारखंच सेलिब्रेशन; दोघांच्याही सेलिब्रेशनचा रोख नेमका कोणाकडे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com