चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला बाद घोषित केल्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. या सामन्यात तो शानदार फलंदाजी करत होता. मात्र नेमकं तेव्हाच तो धावबाद झाला आणि त्याच्या बाद घोषित करण्यावरून वाद पेटला. फाफ डू प्लेसिससह विराट कोहलीही आश्चर्यचकित असल्याचं दिसून आलं. दरम्यान फाफ डू प्लेसिस आऊट होता का? जाणून घ्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची फलंदाजी सुरु असताना १३ वे षटक टाकण्यासाठी मिचेल सँटनर गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर रजत पाटीदारने सरळ शॉट मारला. हा चेंडू मिचेल सँटनरच्या हाताला लागुन यष्टीला जाऊन धडकला. त्यानंतर सँटनरसह संपूर्ण संघाने रनआऊटची अपील केली. त्यानंतर अंपायरने हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवला. त्यानंतर तिसऱ्या अंपायरने निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ घेतला. फाफची बॅट हवेत आहे, असं निदर्शनास येताच अंपायरने त्याला आऊट घोषित केलं. अंपायरने घेतलेल्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून फाफ डू प्लेसिसने ३९ चेंडूंचा सामना करत ५४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. तर रजत पाटीदारने ४१ आणि विराट कोहलीने ४७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद २१८ धावा केल्या.
चेन्नईला हा सामना जिंकण्यासाठी २१९ धावा करायच्या होत्या. तर प्लेऑफमध्ये क्लालिफाय करण्याासाठी या संघाला २० षटकात २०१ धावा करायच्या होत्या. मात्र चेन्नईचा संघ २०० धावांचा पल्ला गाठू शकला नाही. त्यामुळे चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून यश दयालने शानदार गोलंदाजी केली. त्याने संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने हा सामना २७ धावांनी जिंकला. यासह या संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ या हंगामातील प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा तिसराच संघ ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.