Ruturaj Gaikwad Statement: चेन्नईचं नेमकं चुकलं तरी कुठं? कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितली पराभवाची कारणं

RCB vs CSK, IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने पराभवाचं कारण सांगितलं आहे.
Ruturaj Gaikwad Statement: चेन्नईचं नेमकं चुकलं तरी कुठं? कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितली पराभवाची कारणं
ruturaj gaikwad statement after chennai super kings vs royal challengers bengaluru match amd2000twitter
Published On

बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला २७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासह चेन्नई सुपर किंग्जचा संघप्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. यासह १४ गुणांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ हा प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला आहे. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

या पराभवानंतर बोलताना कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ' खरं सांगू तर ही खेळपट्टी चांगली होती. खेळपट्टीवर स्पिन होता आणि चेंडू थांबून येत होता. मात्र या खेळपट्टीवर २०० धावा केल्या जाऊ शकत होत्या. मात्र आम्ही मोक्याच्या क्षणी विकेट्स गमावल्या. केवळ २ मोठे हिट्स हवे होते. हे टी -२० क्रिकेट आहे, असं होण साहजिक आहे.'

Ruturaj Gaikwad Statement: चेन्नईचं नेमकं चुकलं तरी कुठं? कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितली पराभवाची कारणं
RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

तसेच तो पुढे म्हणाला की, ' १४ पैकी ७ सामने जिंकण्याचा मला आनंद आहे. फक्त शेवटच्या २ सामन्यांमध्ये आम्हाला विजय मिळवता आला नाही. या स्पर्धेदरम्यान आम्हाला मोठे धक्के बसले आहेत. डेवोन कॉनव्हेची अनुपस्थिती, संघात फ्रंट लाईन गोलंदाज नसणं. नक्कीच प्रमुख खेळाडू नसण्याचा फटका आम्हाला बसला आहे. CSK चा स्टाफ आणि आमच्यासाठी संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्यांना याचं श्रेय जातं. पहिल्याच सामन्यात आमच्यासमोर अनेक आव्हानं होती.'

Ruturaj Gaikwad Statement: चेन्नईचं नेमकं चुकलं तरी कुठं? कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितली पराभवाची कारणं
RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फाफ डू प्लेसिसने ३९ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने २९ चेंडूत ४७ धावा केल्या. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद २१८ धावा केल्या.

चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी २०१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाला ७ गडी बाद १९१ धावा करता आल्या. चेन्नईकडून रचिन रविंद्रने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर जडेजाने नाबाद ४२ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com