Virat Kohli saam tv
Sports

Virat Kohli: 'किंग' कोहलीला ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा सल्ला, "विराट स्वतःशीच लढाई थांबवेल तेव्हाच..."

Virat Kohli avoid overthinking: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली शून्यावर बाद झाल्याने त्याच्या फॉर्मबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज आणि समालोचक मॅथ्यू हेडन यांनी विराट कोहलीला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय चाहत्यांची विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र विराटला ते शक्य झालं नाही. मार्च २०२५ नंतर विराटने आपला पहिला ODI सामना खेळताना, पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर ऑफ स्टम्पच्या बाहेर खेळताना विकेट गमावली.

शून्यावर बाद झाल्यानंतर, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने विराट कोहलीला जास्त विचार करणं किंवा स्वतःशी वादविवाद करणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.

मॅथ्यू हेडनने कोहलीच्या टेकनीक आणि एकूण खेळाच्या दृष्टीकोनावर विश्वास व्यक्त केला, कारण कोहलीने या फॉरमॅटमध्ये भरपूर अनुभव मिळवला आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हेडन म्हणाला की, “विराट कोहलीची स्ट्राइकिंग क्षमता आणि बॉलला स्पर्श करण्याची वेळ अत्यंत उत्कृष्ट आहे. या फॉरमॅटमध्ये १४,००० रन्स केल्यानंतर त्याच्या खेळाच्या दृष्टीकोनावर शंका घेण्यास काही कारण नाही. तो सतत बॉलवर चांगला वेळ घेऊन खेळतो आणि सुरुवातीपासूनच टायमिंग साधतो.”

त्याने पुढे सांगितले, “एक गोष्ट मला आशा आहे की, तो स्वतःसोबतची लढाई थांबवेल किंवा जास्त विचार करणं टाळेल. स्पष्टता, निश्चितता आणि खेळ समजण्याची क्षमता असताना तो फारच घातक ठरतो या गुणांमुळे त्याचा अनुभव त्याला मदत करतो.”

पहिला ODI ऑस्ट्रेलियाने सात विकेट्सने जिंकला. दुसरा सामना गुरुवारी अॅडिलेडमध्ये होणार आहे. या सामन्यात देखील चाहत्यांचं विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या खेळाकडे लक्ष राहणार आहे.

दरम्यान, भारतीय पेसर अर्शदीप सिंगने कोहलीच्या कामगिरीवर भाष्य केलंय. अर्शदीप म्हणाले, “त्याने भारतासाठी ३०० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत, त्यामुळे ‘फॉर्म’ हा शब्द त्याच्यासाठी फारसा महत्वाचा नाही. तो कसा खेळ सुरू करतो हे त्याला माहीत आहे. त्याच्यासोबत ड्रेसिंग रूममध्ये असणं नेहमीच आशीर्वाद आहे. मला वाटतं की, या सिरीजमध्ये त्याच्याकडून अजून बरेच रन्स येणार आहेत. ”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

Best Bus Accident: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात; आरे कॉलनीत बेस्ट बस आणि ट्रकची जबर धडक, व्हिडिओ व्हायरल

ठाकरे बंधूंमध्ये ४ तास खलबतं, बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली? VIDEO

SCROLL FOR NEXT