यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

Team India Probable Playing XI : ऑस्ट्रेलियाच्या पर्थ स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी कोणाला संधी मिळून शकते? वाचा
Ind Vs Aus Team India Probable Playing XI
Ind Vs Aus Team India Probable Playing XIx
Published On

Ind Vs Aus Team India Probable Playing XI : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, या दौऱ्यातील पहिला वनडे सामना उद्या म्हणजेच १९ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. सामन्याला सकाळी नऊ वाजता सुरुवात होईल. शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारताचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थच्या मैदानावर उतरणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात दिसणार आहेत.

पहिल्या वनडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात माजी कर्णधार रोहित शर्मा आणि नवा कर्णधार शुभमन गिल हे सलामीसाठी येतील हे निश्चित झाले आहे. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. रोहित आणि विराट यांच्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

Ind Vs Aus Team India Probable Playing XI
टेस्ट, वनडे आणि टी-२० नंतर क्रिकेटमध्ये नव्या फॉरमॅटची एन्ट्री! कुठे आणि कधी होणार सुरूवात? नियम कोणते?

उपकर्णधार श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर आणि त्यानंतर केएल राहुल पाचव्या क्रमांकावर खेळतील. पाहायला गेल तर भारताच्या फलंदाजांचा क्रम २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासारखा असेल. नितीश कुमार रेड्डीला सहाव्या क्रमांकावर संधी मिळू शकते. त्यानंतर अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर येईल. अक्षर पटेलऐवजी वॉशिंग्टन सुंदरही संघात सामील केले जाऊ शकते.

Ind Vs Aus Team India Probable Playing XI
२०२७ चा वर्ल्डकप खेळणार, ट्रॉफी जिंकणार; रोहित शर्माने मराठीत चिमुकल्या फॅन्सला दिलं आश्वासन

गोलंदाजी विभागाचा विचार केल्यास, कुलदीप यादव हा मुख्य फिरकी गोलंदाज असेल. कुलदीप आणि अक्षर यांच्यामुळे दोन फिरकीपटू गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध होतील. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्याकडे असेल. हर्षित राणाला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळणार नसल्याचे म्हटले जात आहे.

Ind vs Aus पहिल्या वनडे सामन्यासाठी भारताचे संभाव्य ११ शिलेदार -

रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा

Ind Vs Aus Team India Probable Playing XI
अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्यूवर संतापले जय शाह, BCCI नेही केला निषेध; आता पाकिस्तानच काही खरं नाही!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com