टेस्ट, वनडे आणि टी-२० नंतर क्रिकेटमध्ये नव्या फॉरमॅटची एन्ट्री! कुठे आणि कधी होणार सुरूवात? नियम कोणते?

Test Twenty : आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये टेस्ट, वनडे आणि टी२० फॉरमॅटनंतर नव्या, चौथ्या फॉरमॅट खेळला जाणार आहे. या फॉरमॅटचे नाव टेस्ट ट्वेंटी असे आहे.
New Test Twenty Format
New Test Twenty Formatx
Published On
Summary
  • क्रिकेटमध्ये टेस्ट, वनडे, टी-२० नंतर नव्या 'टेस्ट ट्वेंटी' फॉरमॅटची एन्ट्री

  • हा फॉरमॅट ८० ओव्हर्सचा असेल, टेस्ट आणि टी-२०चा संमिश्र अनुभव

  • स्पर्धा १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी २०२६ जानेवारीपासून भारतात सुरू होणार

Test Twenty Format : टेस्ट, वनडे आणि टी२० असे सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तीन फॉरमॅट आहेत. या तीन अधिकृत फॉरमॅट्ससह क्रिकेटचे आणखी दोन फॉरमॅटही पाहायला मिळतात. द हंड्रेड लीग ही १००-१०० चेंडूंची स्पर्धा आहे, या स्पर्धेलाही टी-२० फॉरमॅटचा दर्जा देण्यात आला आहे. याशिवाय आणखी एक टी-१० असा क्रिकेटचा फॉरमॅट उपलब्ध आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नव्या 'टेस्ट ट्वेंटी' फॉरमॅटची घोषणा करण्यात आली आहे. या फॉरमॅटमध्ये टेस्ट आणि टी२० क्रिकेट यांचे संमिश्रण असेल असे म्हटले जात आहे. क्रिकेटच्या चौख्या फॉरमॅटचे अनावरण देखील करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटमध्ये नवीन फॉरमॅट उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या फॉरमॅटचे नाव टेस्ट ट्वेंटी असे असेल. नावावरुनच या फॉरमॅटमध्ये टेस्ट क्रिकेट आणि टी२० क्रिकेट एकत्रितपणे खेळले जाईल. या फॉरमॅटमधील स्पर्धा १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी असेल. ही स्पर्धा पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये भारतात खेळली जाण्याची शक्यता आहे.

New Test Twenty Format
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

वेस्ट इंडियन संघाचे दिग्गज कर्णधार सर क्लाईव्ह लॉइड, भारतीय माजी फिरकीपटू हरभजन सिंह, ऑस्ट्रेलियन दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स हे या लीगशी संलग्न असणार आहेत. भारतीय शिल्पकार गौरव बहिरवानी यांनी राजस्थान रॉयल्सचे माजी सीईओ मायकल फोर्डहॅम यांच्या सहकार्याने ही लीग सुरु करण्याची योजना आखली आहे.

New Test Twenty Format
१८६ महागड्या कार खरेदी करत २१ कोटी रुपयांची बचत, गुजरातमध्ये जैन समाजाने लढवली अजब शक्कल; प्रकरण काय?

टेस्ट ट्वेंटी फॉरमॅट कसा असेल?

आयोजकांच्या मते, टेस्ट ट्वेंटी फॉरमॅटमधील स्पर्धा जानेवारी २०२६ मध्ये सुरु होईल. सामन्यामध्ये चार ब्रेक असतील. हा सामना ८० ओव्हर्सचा असेल. प्रत्येक संघाला ४० ओव्हर्स खेळावे लागतील. प्रत्येक डावात २० ओव्हर्स असतील. जर एखादा संघ पहिल्या डावात ७५ धावांनी पिछाडीवर असेल तर त्यांना फॉलोऑन करावे लागेल. स्पर्धेमध्ये ९६ खेळाडू सहभागी होतील, सुरूवातीच्या हंगामात स्पर्धेत सहा संघ असतील.

New Test Twenty Format
ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com