१८६ महागड्या कार खरेदी करत २१ कोटी रुपयांची बचत, गुजरातमध्ये जैन समाजाने लढवली अजब शक्कल; प्रकरण काय?

Viral News : जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेतील सदस्यांनी एकत्रितपणे १८६ महागड्या कार खरेदी केल्या. एकत्रितपणे खरेदी केल्याने संघटनेतील सदस्यांनी तब्बल २१ कोटींची बचत केली.
Viral News
Viral Newsx
Published On
Summary
  • गुजरातच्या जैन समाजाची कमाल

  • १८६ महागड्या कार खरेदी केल्या

  • खरेदीदरम्यान २१ कोटींची केली बचत

Viral : गुजराती लोक हे नेहमीच व्यावसायिक कौशल्य आणि दूरदर्शी विचारसरणीसाठी ओळखले जातात. पैसे कमवण्यापेक्षा योग्य पद्धतीने पैसे खर्च करणे ही एक कला असल्याचे त्यांनी एका कृतीतून दाखवून दिले आहे. जैन समाजाची संघटना असलेल्या जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना म्हणजेच JITO तील सदस्यांनी एकत्रितपणे महागड्या कार खरेदी करत २१ कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशांची बचत केली.

JITO च्या नेतृत्वाखाली देशभरातील १८६ सदस्यांनी संयुक्तपणे ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज सारख्या ब्रँडच्या लक्झरी कार खरेदी केल्या. या सर्व कारच्या किमती ६० लाख रुपयांपासून ते १.३४ कोटी रुपयांपर्यंत होत्या. खरेदीमध्ये अहमदाबाद आणि गुजरातमधील इतर अनेक शहरांमधील जैन कुटुंबांनी उत्साहाने सहभाग घेतला. जेव्हा एकत्र खरेदी करतो तेव्हा ब्रँडना एकाच वेळी मोठ्या विक्रीचा फायदा होतो, असे JITO चे उपाध्यक्ष हिमांशू शाह यांनी स्पष्ट केले.

Viral News
दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना! खासदारांच्या निवासस्थानाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; VIDEO

जेव्हा आपण एकत्रितपणे खरेदी करुन तेव्हा त्याच्या बदल्यात कंपन्या विशेष सवलती देण्यास तयार असतात. यामुळे समाजातील, संघटनेमधील सदस्यांना लक्षणीय सवलती मिळतात. याशिवाय कंपनीचा अतिरिक्त जाहिरातीचा खर्च देखील वाचतो, असेही हिमांशू शाह यांनी सांगितले. सामूहिक खरेदीमध्ये १४९.५४ कोटी रूपयांच्या किमतीच्या लक्झरी कार खरेदी करण्यात आल्या आणि २१.२२ कोटी रुपयांची बचत झाल्याचे शाह यांनी सांगितले.

Viral News
ऐन दिवाळीत ठाकरेसेनेला खिंडार, जेष्ठ नेत्यानं असंख्य सहकाऱ्यांसह हाती घेतलं भाजपचं 'कमळ'

या मॉडेलपासून प्रेरणा घेत गुजरातमधील भरवाड समाजाने एकत्रितपणे खरेदी केली. भरवाड युवा संघटना गुजरातने एकत्रितपणे तब्बल १२१ जेसीबी मशीन खरेदी केल्या. यामुळे त्यांना प्रत्येक मशीनला अंदाज ३.३ लाख रुपयांची सूट मिळाली. एकत्र खरेदी केल्याने संघटनेने अंदाजे ४ कोटी रुपयांची बचत केल्याचे म्हटले जात आहे.

Viral News
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com