दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना! खासदारांच्या निवासस्थानाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; VIDEO

Delhi Fire : देशाची राजधानी दिल्लीमध्ये दुर्घटना घडली आहे. खासदाराच्या निवासस्थानांपैकी एक असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्समध्ये आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
Delhi Fire
Delhi Fireani
Published On

Delhi Fire Incident : राजधानी दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. दिल्लीतील प्रतिष्ठित ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्समध्ये भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. ज्या ठिकाणी आग लागले, ते ठिकाणी नवी दिल्लीतील खासदारांचे स्टाफ क्वार्टर असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१८ ऑक्टोबर) दिल्लीतील बीडी मार्गावरील बहुमजली ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्समध्ये आग लागली. संकुलाच्या वरच्या मजल्यांपैकी एका मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचा भडका उडाल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

Delhi Fire
महिलेनं धावत्या लोकलवर फेकला दगड, VIDEO व्हायरल, मुंबई पोलिसांची एन्ट्री झाली अन् सत्य आलं समोर

नवी दिल्लीतील संसदेपासून फक्त २०० मीटर अंतरावर असलेले ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्स हे संसदेतील सदस्यांना वाटप करण्यात आलेल्या अधिकृत निवासस्थानांपैकी एक आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आगीचे ठिकाण असलेल्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० मध्ये केले होते. तेथे अनेक राज्यसभा खासदार राहत असल्याचेही वृत्त आहे.

Delhi Fire
तेरी मेहरबानियाँ ! मालकाचा मृत्यू झाला, अंत्यसंस्कार झाले; निष्ठावान कुत्रा स्मशानभूमीतच राहिला, ९ दिवस...

नवी दिल्लीतील डॉ. बिशंबर दास मार्गावर हे प्रतिष्ठित ब्रह्मपुत्र अपार्टमेंट आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यांपैकी एका मजल्यावर आग लागली. त्यानंतर याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु झाली. या घटनेमुळे रहिवशांमध्ये घबराट पसरली आहे.

Delhi Fire
धक्कादायक! आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलं, १० दिवसात ३ पोलिसांची आत्महत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com