
घरात गळफास घेत एएसआयची आत्महत्या
कौटुंबिक कलहातून आयुष्य संपवलं
१० दिवसात ३ पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या
Shocking Incident : एका एएसआयने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घरगुती कलहामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळावरून पोलीस आणि फॉरेन्सिक टीमला एक सुसाईड नोट देखील मिळाली आहे. मृत्यूला माझी पत्नी आणि सासरचे जबाबदार आहेत, असे नोटमध्ये लिहिल्याचे म्हटले जात आहे. ही घटना हरियाणातील रेवाडी येथे घडली आहे.
मृत्यू झालेल्या एएसआयचे नाव कृष्णा यादव (वय ४० वर्षे) असे आहे, ते मूळचे जैनाबाद गावचे रहिवासी होते. २००४ मध्ये कृष्णा कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले होते. कामानिमित्त ते गावी गेले होते, आज त्यांनी गावच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कृष्णा यांचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा यादव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. या नोटमध्ये कृष्णा यांनी त्यांच्या पत्नीवर छळाचा आरोप केला होता. सुसाईड नोट आणि कृष्णा यांच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे, पत्नीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रार करून पत्नी माझा छळ करत होती असा आरोप नोटमध्ये करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये त्यांचे सासरे आणि मेहुणे यांचाही समावेश आहे.
१० दिवसात ३ आत्महत्या!
मागील दहा दिवसांमध्ये आत्महत्या करणारा हरियाणा पोलीस दलातील तिसरा कर्मचारी आहे. ७ ऑक्टोबर रोजी आयपीएस वाय. पुरण कुमार यांनी चंदीगडच्या सेक्टर ११ येथील त्यांच्या निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी रोहतकमधील सायबर सेलमध्ये काम करणारे एएसआय संदीप लाठर यांनी त्यांच्या मामाच्या शेतातील खोलीत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आता एएसआय कृष्णा यादव यांनी आयुष्य संपवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.