Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाच्या अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

Ind vs Aus 1st ODI Weather Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे रविवार, १९ ऑक्टोबरला होणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचं संकट घोंघावत आहे. पर्थच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यावेळी हवामान कसा असेल, पावसामुळं हा सामना रद्द होणार का? जाणून घ्या.
Rohit Sharma and Gautam Gambhir at perth
Rohit Sharma and Gautam Gambhir at perthsaam tv
Published On
Summary
  • भारत-ऑस्ट्रेलिया पहिला वनडे सामना १९ ऑक्टोबरला पर्थमध्ये होणार

  • भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता सामना होणार सुरू

  • पर्थमध्ये सकाळी दोन तास पाऊस पडण्याची शक्यता

  • पाऊस थांबला नाही तर सामना रद्द होऊ शकतो

India vs Australia ODI Match Weather Update : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंमुळं भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा चर्चेत आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी, १९ ऑक्टोबरला होणार आहे. या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पहिला वनडे सामना पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात रोहित-विराट दोघेही खेळणार आहेत. त्यामुळं चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पण हा सामना पावसामुळं रद्द होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पर्थमध्ये आज हवामान चांगलं असलं तरी, उद्या १९ ऑक्टोबरला पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पर्थचं हवामान कसं असेल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार, सकाळी ९ वाजता सुरू होईल. या सामन्याचा टॉस अर्धा तास आधी म्हणजे साडेआठ वाजता होईल. मात्र, पर्थमध्ये १९ ऑक्टोबरच्या सकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दिवशी जवळपास दोन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस थांबल्यानंतर काही वेळ ऊन पडू शकतं. पण उर्वरित दिवसभर ढगाळ वातावरण राहील. या दिवशी तापमान १९ अंश सेल्सियसपर्यंत राहील, असाही अंदाज आहे.

पहिला वनडे सामना पावसामुळं रद्द होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना होणार आहे. पण या दरम्यान साधारण दोन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळीच पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं त्यानंतर ५० षटकांचा सामना पूर्ण खेळवला जाऊ शकतो. जर पाऊस थांबला नाही तर, हा सामना रद्द केला जाऊ शकतो. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही.

Rohit Sharma and Gautam Gambhir at perth
Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का? अजित आगरकर पहिल्यांदाच इतका स्पष्ट बोलला

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा.

ऑस्ट्रेलियाचा संघ

ट्रॅविस हेड, मिशेल मार्श, जेवियर बार्टलेट, कुपर कोनोली, बेन ड्वार्शिस, जोश हेजलवुड, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन, मिशेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ, जोश फिलिप, मॅथ्यू शॉर्ट, मिशेल स्टार्क.

Rohit Sharma and Gautam Gambhir at perth
Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com