virat kohli yandex
क्रीडा

T20 World Cup 2024: विराटला T-20 WC साठी टीम इंडियात स्थान मिळणार नाही! धक्कादायक कारण आलं समोर

Reason Why Virat Kohli in T20 World Cup 2024: विराटला भारतीय संघात स्थान मिळणार की नाही याबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli News:

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. एका रिपोर्टमध्ये असं म्हटलं जात आहे की, जूनमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत विराट कोहलीा भारतीय संघात स्थान मिळणार नाही. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरारा येत्या जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे. काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला होता. या स्पर्धेत अनेकदा भारतीय संघ अडचणीत असताना त्याने महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र माध्यमातील वृत्तांमध्ये असं म्हटलं जात आहे की, बीसीसीआयच्या मते वेस्टइंडिजची स्लो खेळपट्टी विराटसाठी फलंदाजी करण्यासाठी अनुकूल नसेल. तसेच या वृत्तात असा देखील खुलासा करण्यात आला आहे की, युवा खेळाडूंना मार्ग करुन देण्यासाठी विराटची समजूत काढण्याची जबाबदारी ही मुख्य निवडकर्ता अजित आगरकरकडे सोपवण्यात आली आहे. (Cricket news in marathi)

नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठा खुलासा करत म्हटले होते की, आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार. यासह त्यांनी असंही म्हटलं होतं की, याबाबत योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल.

कोहलीला भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी एकमेव मार्ग शिल्लक...

टी-२० वर्ल्डकप सुरु व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ कुठलीही मालिका खेळणार नाहीये. सर्व खेळाडू आता आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहेत. त्यामुळे विराटला जर भारतीय संघात स्थान मिळवायचं असेल तर आयपीएल २०२४ स्पर्धा हा एकमेव पर्याय आहे. या स्पर्धेत जर त्याची बॅट तळपली. तर त्याचं संघातील स्थान निश्चित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :फक्त लीड मोजा, महायुती १६० जागांवर येईल - चंद्रकांत पाटील

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT