AUS vs WI ODI Series: ऑस्ट्रेलियाने इतिहास रचला! अवघ्या ४१ चेंडूत विंडिजला चारली धूळ

Australia vs West Indies 3rd ODI: ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला आहे.
aus vs wi
aus vs witwitter
Published On

Australia vs West Indies:

ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वेस्टइंडिजवर ३-० ने विजय मिळवला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि वेस्टइंडिजला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. वेस्टइंडिजचा डाव अवघ्या ८७ धावांवर आटोपला. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने अवघ्या ६.५ षटकात पूर्ण केलं.

वेस्टइंडिज संघाकडून फलंदाजी करताना एलिक एथानाजेने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. मात्र त्याला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर जॉन ओटलीने ८, कीसी कार्टीने १०, कर्णधार शाय होपने ४ धावा केल्या. या सुमार कामगिरीमुळे वेस्टइंडिजचा डाव २४.५ षटकात संपुष्टात आला.

aus vs wi
Rohit Sharma Statement: 'तो चॅम्पियन खेळाडू..' शानदार विजयानंतर रोहितने या २ खेळाडूंचं केलं कौतुक

तसेच ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना जेवियर बार्टलेटने अप्रतिम गोलंदाजी केली. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ४ गडी बाद केले. त्याने जॉन ओटली, रोमारियो शेफर्ड,रोस्टन चेज आणि अल्जारी जोसेफला बाद करत माघारी धाडलं. अॅडम झाम्पा आणि लँस मॉरिसने देखील त्याला चांगली साथ देत प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर सीन अबॉटनेला १ गडी बाद करण्यात यश आलं. (Cricket news in marathi)

aus vs wi
IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड मालिका रद्द होणार? इंग्लंडचा संघ परदेशात जाणार! वाचा कारण

धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय..

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी ८७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ६.५ षटकात म्हणजेच ४१ चेंडूत यशस्वी पाठलाग करत एकतर्फी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीला आलेल्या जॅक फ्रेजर आणि जोश इंग्लिशने आक्रमक सुरुवात केली. दोघांनी मिळून ६७ धावा जोडल्या. यादरम्यान जोश इंग्लिशने नाबाद ३५ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com