Rohit Sharma Statement: 'तो चॅम्पियन खेळाडू..' शानदार विजयानंतर रोहितने या २ खेळाडूंचं केलं कौतुक

Rohit Sharma On Team India: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने संघातील खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
rohit sharma
rohit sharma saam tv news
Published On

IND vs ENG 2nd Test, Rohit Sharma Statement:

विशाखापट्टनमच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने १०६ धावांनी विजय मिळवला आहे. यासह पहिल्या कसोटीतील पराभवाचा बदला घेत भारतीय संघाने मालिकेत १-१ ची बरोबरी साधली आहे.(Rohit Sharma)

या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव २९२ धावांवर आटोपला. १०६ धावांनी मिळवलेल्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने संघातील खेळाडूंचं तोंडभरून कौतुक केलं.

काय म्हणाला रोहित शर्मा?

भारतीय संघाला हैदराबाद कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला होता. आता दुसऱ्या सामन्यात दमदार कमबॅक करत भारतीय संघाने १०६ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर जसप्रीत बुमराहचं (Rohit sharma on jasprit bumrah) कौतुक करताना रोहित शर्मा म्हणाला की, 'तो एक चॅम्पियन खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. जेव्हा तुम्ही असे सामने जिंकता तेव्हा सर्वांच्याच कामगिरीवर लक्ष लागुन असतं.' (Cricket news in marathi)

rohit sharma
IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड मालिका रद्द होणार? इंग्लंडचा संघ परदेशात जाणार! वाचा कारण

तसेच या सामन्यातील पहिल्या डावात द्विशतकी करणाऱ्या यशस्वी जयस्वालबद्दल बोलताना तो म्हणाला की,'त्याने ज्याप्रकारची खेळी केली आहे,त्यासाठी तो कौतुकास पात्र आहे. त्याला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप वेळ आहे. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. काही फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली, मात्र त्यांना त्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. कारण संघात असे अनेके खेळाडू आहेत, जे नवीन आहेत. मात्र येणाऱ्या काळात ते हा फॉरमॅट समजून घेतील. या युवा खेळाडूंसह खेळून बरं वाटलं.' (Rohit sharma on yashasvi jaiswal)

rohit sharma
IND vs ENG 2nd Test: भारत- इंग्लंड दुसऱ्या कसोटीतील जबरदस्त ५ कॅचेस! Video पाहून तुम्हीच ठरवा कोणती आवडली?

भारतीय संघाचा शानदार विजय...

या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघाने या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण डाव अवघ्या २९२ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ची बरोबरी साधली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com