आयपीएल २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. सर्व संघातील खेळाडूंनी सराव करायला देखील सुरुवात केली आहे. स्पर्धेतील १७ व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. यावेळी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान तो आगामी हंगामापूर्वी संघासोबत जोडला गेला असून त्याचं मुंबईच्या ताफ्यात जंगी स्वागत झालं आहे.
मुंबईच्या ताफ्यात हार्दिक पंड्याची एन्ट्री...
मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक पंड्यासोबत मार्क बाऊचर असल्याचं दिसून येत आहे. त्याने मुंबईच्या ताफ्यात एन्ट्री करताच देवाचा आशीर्वाद घेतला आणित नारळ फोडत मार्क बाऊचरची भेट घेतली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
२ वर्षांनंतर करणार कमबॅक..
हार्दिक पंड्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात आयपीएल स्पर्धेपासून केली होती. २०१५ मध्ये तो पहिल्यांदाच या संघासाठी खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्यानंतर २०२२ मध्ये झालेल्या लिलावात त्याला गुजरातने आपल्या ताफ्यात स्थान दिलं. त्याला या संघाचं कर्णधारपद देण्यात आलं होतं. आता २ वर्षांनंतर तो पुन्हा एकदा या संघासाठी खेळताना दिसून येणार आहे. यावेळी तो खेळाडू म्हणून नव्हे तर कर्णधार म्हणून परतला आहे. (Cricket news in marathi)
कर्णधार म्हणून असा राहिलाय रेकॉर्ड...
आयपीएल २०२२ स्पर्धेत हार्दिक पंड्या पहिल्यांदाच कर्णधार म्हणून मैदानात उतरला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना गुजरात टायटन्स संघाने पहिल्याच हंगामात जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर २०२३ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत पुन्हा एकदा फायनल गाठली,मात्र फायनलमध्ये CSK कडून पराभवाचा सामना करावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.