Virat Kohli Ajit Agarkar X
Sports

Virat Kohli : विराटने संपर्क साधला आणि.. इंग्लंड दौऱ्यापूर्वी कोहलीच्या कसोटी निवृत्तीबद्दल अजित आगरकरांचा मोठा खुलासा

Virat Kohli Test Retirement : अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये भारताच्या कसोटी संघाची घोषणा केली. हा संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये आगरकर यांनी विराटच्या निवृत्तीवर भाष्य केले.

Yash Shirke

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर भारताच्या कसोटी क्रिकेट संघाने नेतृत्त्व कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज बीसीसीआयने पत्रकार परिषद घेत टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व शुभमन गिल करणार असल्याचे जाहीर केले.

आयपीएल २०२५ संपल्यानंतर लगेच जून महिन्यात कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने कसोटी संघाची घोषणा केली. शुभमन गिलकडे संघाचे कर्णधारपद, तर रिषभ पंतकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. शार्दुल ठाकूर, करुण नायर यांनी कमबॅक केले आहे. साई सुदर्शनला कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.

रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला. यामुळे भारताच्या कसोटी संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पत्रकार परिषदेमध्ये अजित आगरकर यांनी निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली. 'निवृत्ती घेणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. ते दोघे कसोटी क्रिकेटमधील मोठे खेळाडू होते. त्यांची जागा भरुन काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे', असे वक्तव्य आगरकर यांनी केले.

विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयावर बोलताना अजित आगरकर म्हणाले, 'विराटने एप्रिल २०२५ मध्ये आमच्याशी संपर्क साधला होता. बऱ्याच कालावधीपासून निवृत्ती घेण्याचा विचार मनात असल्याचे सांगितले होते. तो कसोटी क्रिकेटपासून दूर राहू इच्छिच होता. विराट कोहलीच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो.'

कसोटी मालिकेतील फक्त तीन ते चार सामने जसप्रीत बुमराह खेळणार आहे. पाचही सामन्यात तो सहभागी होणार नाही. सध्या संघाला संपूर्ण सामने खेळणारा कर्णधार हवा असल्याने बुमराहला कर्णधारपदी नियुक्ती झाली नसल्याचे म्हटले जात आहे. फिजिओ आणि संपूर्ण व्यवस्थापन बुमराहच्या कामाचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करेल, असे आगरकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT