IND vs ENG, Semi Final: बचके रहना रे बाबा! सेमिफायनलमध्ये तळपते विराटची बॅट! रेकॉर्ड पाहून गोलंदाजांना फुटेल घाम
virat kohli yandex
क्रीडा | T20 WC

IND vs ENG, Semi Final: बचके रहना रे बाबा! सेमिफायनलमध्ये तळपते विराटची बॅट! रेकॉर्ड पाहून गोलंदाजांना फुटेल घाम

Ankush Dhavre

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतील फायनलमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे.दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सेमिफायनलमध्ये अफगाणिस्तानला पराभूत करत स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या सेमिफायनलमध्ये भारतीय संघाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. कारण आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये विराट कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या फलंदाजीक्रमात बदल करण्यात आला आहे. विराट कोहली नेहमी तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजीला येतो. मात्र आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहली सलामीला फलंदाजीला येतोय. मात्र पहिल्या सामन्यापासून ते सुपर ८ फेरीतील शेवटच्या सामन्यापर्यंत विराटची बॅट शांतच आहे. त्याने साखळी फेरीतील सामन्यांमध्ये फ्लॉप कामगिरी केली असली तरीदेखील सेमिफायनलमध्ये त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे.

विराट कोहली हा भारतीय संघातील अनुभवी खेळाडू आहे. त्याला आतापर्यंत ३ सेमिफायनल खेळण्याचा अनुभव आहे. या तिन्ही सामन्यांमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने ३ डावात २११ धावा केल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे यादरम्यान तो २ वेळेस नाबाद राहिला आहे. ही भारतीय संघाला दिलासा देणारी तर इंग्लंडचं टेन्शन वाढवणारी बाब आहे.

विराट कोहलीची टी-२० वर्ल्डकपच्या सेमिफायनलमधील कामगिरी

४४ चेंडूत ७२ धावा- विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०१४

४७ चेंडूत ८९ धावा, विरुद्ध वेस्टइंडिज, २०१६

४० चेंडूत ५० धावा, विरुद्ध इंग्लंड, २०२२

विराट कोहलीची कारकिर्द

विराट कोहली हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत १२३ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला ११५ डावात ४८.८४ च्या सरासरीने ४१०३ धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : नागपुरातील पाटणसावगीत धुमाकूळ घालणाऱ्या वानराला केलं रेस्कू

Worli Hit And Run: वरळीत 'हिट अँड रनचा थरार, भरधाव कारच्या धडकेत पती-पत्नी हवेत उडाले, भीषण अपघाताचा VIDEO समोर

CM Eknath Shinde News: लोकसभा निवडणुकीत गाफिल राहिलो, मुख्यमंत्री शिंदे यांची कबुली

Mumbai Local Train : ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कसारा-आसनगाव लोकलसेवा ठप्प

Late Night Sleeping Side Effects : रात्री एक पर्यंत जागे राहाल तर आरोग्यावर गंभीर परिणाम, वाचा उशिरा झोपण्याचे तोटे

SCROLL FOR NEXT