IND vs SA, Final: विराटने शब्द राखला! रोहितने जे सेमिफायनलमध्ये म्हटलं ते कोहलीने फायनलमध्ये करुन दाखवलं
virat kohli with rohit sharma twitter
क्रीडा | T20 WC

IND vs SA, Final: विराटने शब्द राखला! रोहितने जे सेमिफायनलमध्ये म्हटलं ते कोहलीने फायनलमध्ये करुन दाखवलं

Ankush Dhavre

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत करत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. संपूर्ण स्पर्धेत फ्लॉप ठरलेला विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरलाय. त्याने अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्येवर पोहोचवलं.

आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ नव्या रणनीतीसह मैदानात उतरला होता. नेहमी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारा विराट कोहली यावेळी सलामीला फलंदाजीला आला. मात्र हा प्लॅन फसला. साखळी फेरी आणि सुपर ८ फेरीतील सामन्यांमध्ये विराट कोहलीची बॅट शांतच राहिली. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका देखील केली गेली. मात्र रोहितने त्याच्यावर विश्वास कायम ठेवला. दरम्यान इंग्लंडविरुद्ध झालेल्या सेमिफायनलच्या सामन्यानंतर रोहितने विराटचा बचाव केला होता. रोहितने म्हटलं होतं ते विराटने फायनल सामन्यात करून दाखवलं

काय म्हणाला होता रोहित?

इंग्लंडविरुद्ध झालेल्या सेमिफायनलच्या सामन्यानंतर रोहित म्हणाला होता की, ' विराट दर्जेदार खेळाडू आहे. कुठल्याही खेळाडूवर ही वेळ येऊच शकते. मोठ्या सामन्यांमध्ये तो किती महत्वाचा खेळाडू आहे, हे आम्हाला माहित आहे. जेव्हा एखादा खेळाडू १५ वर्षांपासून क्रिकेट खेळतोय, तेव्हा फॉर्म हा कधीच महत्वाचा मुद्दा नसतो. त्यामुळे विराटचा फॉर्म हे आमच्यासाठी महत्वाचा नाही. कदाचित त्याने फायनलच्या सामन्यासाठी आपला फॉर्म राखून ठेवला असावा. त्यामुळे फायनलच्या सामन्यासाठी आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देऊ.'

विराटने हा शब्द राखला आणि फायनलमध्ये ७६ धावांची शानदार खेळी केली. भारतीय संघाला सुरुवातीला ३ मोठे धक्के बसले होते. त्यानंतर विराटने अक्षर पटेलसोबत मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून ७२ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या १७६ धावांवर पोहोचवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : प्रगतीचे द्वार खुले खुलतील, हाती येईल बक्कळ पैसा; या राशींच्या लोकांचं आज खुलणार भाग्य

Makar Rashi Career : मकर राशीचे लोक स्वभावाने कसे असतात? जाणून घ्या त्यांच्या १० खास गोष्टी

VIDEO: तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार, भक्त संपतापले; मंदिरातील चुकीच्या प्रथा कधी रोखणार?

Beed News: अंबाजोगाईत पहिला भव्य अश्व रिंगण सोहळा रंगला! सोहळ्यात वारकऱ्यांनी फुगड्या, कुस्ती खेळाचा लुटला आनंद

Nagar Manmad Highway Accident : योजनेचा लाभ घेण्याची इच्छा अधुरीच राहिली; तहसील कार्यालयाकडे जाताना वाहनाने उडवले, महिला जागीच ठार

SCROLL FOR NEXT